Slider[Style1]

Style2

Style3[OneLeft]

Style3[OneRight]

Style4

Style5[ImagesOnly]

Style6

Windows In A Box - विंडोज इन ए बॉक्स

Windows In A Box - विंडोज इन ए बॉक्स


          ल्पना करा तुम्ही संगणकावर महत्वाचे काम करत आहात आणी तुम्हाला पटकन गणकयंत्राची गरज भासली तर ते सुरु करण्यासाठी आधी स्टार्ट मध्ये जावे लागते, मग एक्सेसरीज आणी मग तुम्हाला गणकयंत्र सुरु करावे लागते. काही वेळेला संगणकावर प्रस्थापित केलेल्या प्रणालींचे व्यवस्थापन करायचे असेल तर पुन्हा तशीच गिचमिड प्रक्रिया पार पाडावी लागते.. जर तुम्हाला अशाच लहान-सहान गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या तर ?? अशा वेळी 'Windows In A Box - विंडोज इन ए बॉक्स' हा छोटासा प्रोग्राम आपल्या मदतीला येतो. यात आपल्या संगणकावरील वेगवेगळ्या प्रकारच्या १०० पेक्षा जास्त गोष्टी सुरु/बंद करण्यासाठी पर्याय दिले आहेत. उदा - साउंड सेटिंग, फोल्डर ऑप्शन, माउस सेटिंग, मल्टिमीडिया सेटिंग इत्यादी. याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम फक्त २५२ किलो बाईट्स आहे,  तर मग डेस्कटॉपवर हा छोटा शेरपा ठेवायला काहीच हरकत नाही..


किंमत आकार तांत्रिक आवश्यकता* डाउनलोड दुवे
विनामुल्य २५२ के.बी रॅम - एम.बी किंवा जास्त                         
   - - हार्ड डिस्क - १० जी.बी किंवा जास्त
   - - सर्विस पॅक - १ किंवा जास्त         -
   - -              -         -  Just imagine, you are working on your computer and you want to calculate something in calculator, to start calculator, first you have to navigate to start then accessories followed by all programs and then the calculator. Some other programs also require such complicated navigation. What if you are been offered such small programs on your desktop without tons of icons? Windows In A Box is a program which is developed just for this.  This program gives us options to start/stop 100+ features in our PC such as sound settings, folder option, mouse setting, multimedia setting etc.  The plus point is the program occupies just 252 KB of total space, so placing this small Sherpa on desktop is not a bad idea.

  Price Size System Requirements* Download Links
  Free 252 K.B RAM - 512 MB or More
    - - Hard Disk - 10 GB or More
     - - Service Pack - 1 or More         -
     - -          -         -
             Don't forget to share your experience. If any doubts feel free to ask.. तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. आणी अडचण उद्भवली तर येथे मांडा.. 

   Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?

   तुम्ही Android फोन वापरता का? Android वापरताना त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी  साठवतो/सेव्ह करतो. तुम्हाला त्यातील नेहेमी नको असलेल्या गोष्टी कशा लपवता येतात हे आज आपण पाहुयात. तुम्ही एखाद्या सूचनेचा किंवा वेळापत्रकाचा किंवा इतर कोणताही फोटो काढलात पण तो तुम्हाला Android च्या मुख्य/इतर गॅलेरीत दिसायला नको असेल तर तुम्ही तो गॅलेरीतून लपवू शकता, अर्थात सध्यातरी तशी थेट सुविधा देण्यात आलेली नसली तरी आडमार्गाचा वापर करून तुम्ही ते करू शकता. तुम्ही अशाच प्रकारे नेहेमी नको असलेल्या ध्वनिफिती/गाणी किंवा ई-पुस्तके लपवू शकता.

   Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?


   गाणी/फोटो/ध्वनिफिती/व्हिडियो लपवण्याचे फायदे

   • एखादी ध्वनिफीत ही एखाद्या भाषणाची/इतर प्रकारची असू शकते, त्यामुळे ती लपवली तर एम.पी ३ प्लेयर मध्ये गाणी ऐकताना मध्येच ती अनावश्यक ध्वनिफित सुरु होऊन रसभंग होणार नाही.
   • एखादी सूचना/वेळापत्रक याचा फोटो लपवल्यावर गॅलेरीमध्ये तो दिसणार नाही त्यामुळे इतर फोटो सलग पाहत असताना/ स्लाईड शो सुरु असताना मध्येच असे फोटो दिसणार नाहीत.
   • एखादे गाणे तुम्हाला एम.पी ३ प्लेयर मध्ये दिसायला नको असल्यास तुम्ही ते लपवू शकता ज्यामुळे हवी असलेली इतर गाणी तुम्ही एम.पी ३ प्लेयर मध्ये ऐकू शकाल, शिवाय लपवलेले गाणे गरजेनुसार वापरू शकाल.

   तुम्ही लपवलेल्या गाणी/फोटो/ध्वनिफिती ह्या मुख्य गॅलेरी किंवा एम.पी ३ प्लेयर मधून अदृश्य होतातच शिवाय इतर सर्व तत्सम एप्लीकेशन मधून अदृश्य होतात. तुम्ही लपवलेले साहित्य हे अदृश्य झाले असले तरीही तुम्ही ते कोणत्याही फाईल एक्सप्लोररच्या मदतीने जर प्रस्थापित केला असेल तर पाहू शकता.

   गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?
   आपण हे सर्व नोमिडिया फाईलच्या मदतीने लपवू शकतो. ज्या फोल्डर मध्ये नोमिडिया फाईल ठेवलेली असते त्या फोल्डरला सर्व गॅलेरी किंवा एम.पी ३ प्लेयर एप्लीकेशन्स कडून वगळण्यात येते.


   • सर्वप्रथम ES File Explorer सुरु करा (बहुतांश फोनमध्ये हे एप्लीकेशन आधीपासूनच प्रस्थापित केलेले असते) तुमच्या फोनमध्ये हे उपलब्ध नसल्यास ते या दुव्यावरून प्रस्थापित/Install करा. हे एक फायदेशीर एप आहे, याचे अनेक उपयोग आपण पुढे बघणार आहोत.
   • एप्लीकेशन सुरु केल्यानंतर फोनमध्ये किवा मेमरी कार्डमध्ये तुम्हाला हव्या त्या नावाने नवीन फोल्डर तयार करा आणी त्यात .nomedia नवीन फाईल तयार करा (nomedia च्या आधीचा टिंब विसरू नका)
   • आता तुम्हाला लपवायच्या असलेल्या फाईल पर्यंत या, आणी त्या फाईल/फाईल्सना तुम्ही आधी तयार केलेल्या फोल्डरमध्ये हलवा.
   • फोन बंद करून पुन्हा सुरु करा.
   • तुमची ती फाईल आता अदृश्य झाली असेल. तुम्हाला ती फाईल ES File Explorer मधून देखील लपवायची असेल तर त्या फाईलवर बोट/स्टायलस धरून ठेवा आणी ती निवडली गेल्यावर More हा पर्याय निवडून Hide ची निवड करा. तुमची फाईल ES File Explorer मधून अदृश्य होईल. (जर फाईल अजूनही दिसत असेल तर खाली दिलेला "महत्वाचा टप्पा" वाचा.)


   पुन्हा फाईल/फाईल्स दिसण्यासाठी


   •  एकदा लपवलेली फाईल/फाईल्स पुन्हा दिसण्यासाठी फक्त नोमिडिया फाईल नष्ट/डिलीट करा.
   •  ES File Explorer मध्ये लपवलेली फाईल/फाईल्स पुन्हा दिसण्यासाठी एप्लीकेशन सुरु केल्यानंतर पर्यायांमधून Hide List निवडा आणी दिसायला हव्या असणाऱ्या फाईल्सच्या पुढे दिसणारा Restore हा पर्याय निवडा.   फोन मधील सर्व फाईल्स संकेताक्षराने/पासवर्डने लपवण्यासाठी Password Settings हा पर्याय निवडून Start Protect निवडा आणी हवे असलेले संकेताक्षर लिहा, याशिवाय Sdcard मध्ये वर सांगितल्याप्रमाणे .nomedia फाईल तयार करा. पुढे दर वेळी एप्लीकेशन सुरु केल्यानंतर तुम्हाला संकेताक्षर द्यावे लागेल.

   संपुर्ण फोल्डर लपवण्यासाठी

   •  एक एक फाईल लपवण्यापेक्षा तुम्ही संपुर्ण फोल्डर देखील लपवू शकता. जे फोल्डर लपवायचे आहे त्या फोल्डर मध्ये .nomedia फाईल तयार करा.


   उदाsdcard/ ext_sdcard/ DCIM/ Camera मध्ये .nomedia फाईल तयार केल्यावर गॅलेरीमध्ये कॅमेर्यामधून काढलेले फोटो दिसणार नाहीत.

   महत्वाचा टप्पा


   • आता वरील सर्व गोष्टी केल्यानंतर महत्वाचे म्हणजे सिस्टिम (आपला फोन) रिफ्रेश करणे. यासाठी फोनचा सेटींग्स पर्याय निवडा आणी त्यात एप्स (Apps) हा उपपर्याय निवडा. 
   • जर तुम्ही व्यवस्थितपणे इथपर्यंतच पोहोचला असाल तर तुम्हाला DOWNLOADED - ON SD CARD - RUNNING - ALL असे चार पर्याय दिसतील (फोनची स्क्रीन लहान असेल तर तीनच पर्याय दिसतील, त्यावेळी RUNNING हा पर्याय तुमच्या डाव्या बाजूला सरकवा)
   • आता तुम्ही प्रस्थापित केलेले एप्स तुम्हाला दिसतील, त्यात Gallery निवडून अनुक्रमे Clear Cache - Clear Data - Force Stop निवडा (याने डाटा पुसला जाणार नाही, निश्चिंत रहा)
   • आता हीच प्रक्रिया Media Storage आणी  Music हे एप्स निवडून पुन्हा करा, ह्यानंतर फोन बंद करून पुन्हा सुरु करा.

   तुमच्या Android फोनमध्ये हे प्रयोग जरूर करून पहा आणी काही अडल्यास इथे बिनधास्त विचारा..

   Soft Key Revealer - सॉफ्ट कि रीव्हेलर

   Soft Key Revealer - सॉफ्ट कि रीव्हेलर

             तुमच्या संगणकावरील विंडोज प्रणालीचा परवाना क्रमांक काय आहे? किंवा तुमच्या संगणकावरील ऐनटीवायरसच्या परवाना क्रमांकाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे संगणकावर प्रस्थापित केलेल्या संगणक प्रणाल्यांच्या परवाना क्रमांकाची नोंद आहे का? जर नसेल तर सॉफ्ट कि रीव्हेलर तुमची या कामासाठी मदत करेल. तुम्ही विकत घेतलेल्या आणी मर्यादित काळासाठी प्रस्थापित केलेल्या संगणक प्रणाल्यांच्या परवाना क्रमांकांची माहिती दोन्हीची नोंद घेतली जाईल, यामुळे तुमचे एक महत्वाचे काम होईल जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे तुमच्या संगणक प्रणालींच्या परवाना क्रमांकाच्या नोंदी सुरक्षित राहतील. तुम्ही सर्व संगणक प्रणालींचे परवाना क्रमांक मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नोंदवुन घेऊ शकता. त्वरा करा आणी तुमच्या संगणक प्रणालींचे परवाना क्रमांक नोंदवुन ठेवा. नोंद असलेली फाईल संगणकाशिवाय दुसर्या ठिकाणी देखील सुरक्षित ठेवा.


   किंमत आकार तांत्रिक आवश्यकता* डाउनलोड दुवे
   विनामुल्य १८०  के.बी रॅम - १२८ एम.बी किंवा जास्त
      - - हार्ड डिस्क - १ जी.बी किंवा जास्त
      - - सर्विस पॅक - १ किंवा जास्त         -
      - -          -         -              What is product/cd key of your windows version? or what is license key of your antivirus? Don't you remember? Do you have backup of all the license keys of softwares installed on your computer? If not, then get it now. Soft Key Revealer will help you to take backup of all of the software license keys including paid and free softwares. It performs one of the important tasks so that your license keys will remain safe if any data corruption occurs. You can import all of keys in Microsoft word file with a single click. Hurry up and backup your keys with Soft Key Revealer. Copy your backup word file on another place along with your computer.

    Price Size System Requirements* Download Links
    Free 180  KB RAM - 125 MB or More
       - - Hard Disk - 1 GB or More
       - - Service Pack - 1 Or More         -
       - -          -         -


               Don't forget to share your experience. If any doubts feel free to ask.. तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. आणी अडचण उद्भवली तर येथे मांडा.. 

     Windows 8 Transformation Pack - विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक


     Windows 8 Transformation Pack - विंडोज ८ ट्रांसफॉरमेशन पॅक

               तुम्ही विंडोजचे चाहते आहात का ? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे नुकतेच मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ आणी ८ अशा दोन आवृत्यांमध्ये विंडोज आपल्यासमोर आणले आहे. नवीन आवृत्या ह्या विंडोजच्या जुन्या आवृत्यांपेक्षा बर्याच प्रमाणात वेगळ्या आहेत, असे असले तरीही काही विंडोज चाहत्यांना अजुनही विंडोजची जुनी आवृत्ती विंडोज एक्स.पी अधिक आवडते. काही मंडळींना विंडोजची नवीन आवृत्ती आवडत असुनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या संगणकात प्रस्थापित करता येत नाही. तुम्हाला तुमच्या संगणकात विंडोज एक्स.पी हीच आवृत्ती ठेवुन त्याचे केवळ रंगरूप बदलुन विंडोज ८ सारखे करायची इच्छा आहे का ? जर उत्तर हो असेल तर 'Windows 8 Transformation Pack - विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक' तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. हा पॅक वापरून तुम्ही तुमच्या संगणकावरील चेहरा-मोहरा बदलु शकता आणी तेही ऑपरेटिंग सिस्टीम न बदलता. यात विंडोज ८ मधील बर्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. तर मग संगणकाचे रंगरूप बदलुन नव्या रुपात पाहण्यासाठी विंडोज ८ ट्रांसफॉमेशन पॅक वापरून पहायला काहीच हरकत नाही.


     किंमत आकार तांत्रिक आवश्यकता* डाउनलोड दुवे
     विनामुल्य ५८.२ एम.बी रॅम - ५१२ एम.बी किंवा जास्त
        - - हार्ड डिस्क - १० जी.बी किंवा जास्त
        - - सर्विस पॅक - २ किंवा जास्त         -
        - - नेट फ्रेमवर्क - २/४ किंवा ४.५         -                Are you fan of windows OS ? The reason for asking this question is Microsoft has just launched couple of versions of windows which are Windows 7 & 8. New versions differs from the old versions of windows on a large scale, even though some of windows fans loves the windows xp rather than any other. even finding it interesting, some of the people can't update their windows to new versions due to technical issues.Do you want to change the appearance of your current windows like windows 8 without changing operating system ? If the answer is yes then Windows 8 Transformation Pack is the best option for you. you can convert appearance of your pc to windows 8 without changing windows xp. This packs gives you many services similar to windows 8. So to changing the appearance of windows xp with the help of Windows 8 Transformation Pack is not a bad option.

      Price Size System Requirements* Download Links
      Free 58.2  MB RAM - 512 MB or More
        - - Hard Disk - 10 GB or More
         - - Service Pack - 2 or More         -
         - - Net Framework - 2/4 or 4.5         -


                 Don't forget to share your experience. If any doubts feel free to ask.. तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. आणी अडचण उद्भवली तर येथे मांडा.. 

       Internet Download Manager - इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर

       Internet Download Manager - इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर

                 तुम्ही संगणकावर वारंवार विविध प्रकारच्या फाईल्स डाउनलोड करत असाल तर असे समजा की इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर खास तुमच्यासाठीच बनवण्यात आलाय. जसे की नावामधुनच आपल्याला कळते की इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर म्हणजे तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करत असलेल्या फाईल्सचा व्यवस्थापक. तुम्ही म्हणाल की जर ब्राऊजर मधून व्यवस्थित फाईल्स डाउनलोड होत असतील तर मग इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरची काय गरज ? पण खरी गमंत यातच आहे मित्रांनो, इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर एका हटक्या पद्धतीने फाईल्स डाउनलोड करतो ज्याने वेळेची बचत तर होतेच पण याचबरोबर काही महत्वाच्या सुविधा देखील मिळतात. जर तुम्ही खूप मोठी फाईल डाउनलोड करत असाल तर ब्राऊजर मध्ये ती पुर्णपणे डाउनलोड होईपर्यंत वाट पहावी लागते, पण तीच फाईल इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरच्या मदतीने डाउनलोड करत असाल तर मात्र तुम्ही हवा तितका वेळ विश्रांती घेऊ शकता. पॉज बटन दाबून संगणक बंद केला आणी नंतर कधीही सुरु केला तर तुम्हाला परत पहिल्यापासुन ती फाईल डाउनलोड करायची आवश्यकता नाही तुम्ही आधी थांबवलेल्या ठिकाणापासुन फाईल डाउनलोड करू शकता. डाउनलोड करताना वेग मिळवण्यासाठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर डाउनलोड करत असलेली फाईल आवश्यकतेनुसार १ ते ३२ भागांमध्ये विभागून डाउनलोड करतो म्हणजे प्रत्येक भाग डाउनलोड व्हायला कमी वेळ लागतो, आणी डाउनलोड झाल्यावर सर्व विभाग एकत्र जोडुन आपल्याला अखंड फाईल देतो. यात यासंबंधी इतरही सुविधा देण्यात आल्या आहेत. तर मग रटाळवाण्या डाउनलोडिंगला करा टाटा आणी करा स्वागत इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरचे..


       किंमत आकार तांत्रिक आवश्यकता* डाउनलोड दुवे
       विनामुल्य ४.३५ एम.बी रॅम - ५१२ एम.बी किंवा जास्त
       संपुर्ण   १,४१२/- ४.३५ एम.बी हार्ड डिस्क - १ जी.बी किंवा जास्त
          - - सर्विस पॅक - १ किंवा जास्त         -
          - -          -         -                  If you downloading various types of files from the Internet frequently then the Internet Download Manager is made just for you. As the name suggests Internet Download Manager means a manager of the files which we download from the Internet. if you are asking, as there is Internet browser is enough sufficient to download files from Internet then why to install Internet Download Manager ? The spark is here, Internet Download Manager downloads the files with a special technique which not only saves our time but also gives us some important facilities. Suppose you are downloading large file from Internet browsers, in that case you have to wait till the download finish (as most of the browsers doesn't provide resume feature) but in Internet Download Manager's case you don't have to wait for the completion of download. you can pause the download and shut down your computer, when you will start it again, you can resume the download from the point on which you paused it (yes there are few exceptions such as one time link). To get the speed while downloading file Internet Download Manager divides the file in 1 to 32 parts according to the requirement and your connection type & speed. so each part takes less time to download. after successfully downloading every part Internet Download Manager combines the all parts and gives us a whole file. There are many related facilities given in this program. So it's time to say good bye to the time consuming downloading processes and hello to Internet Download Manager.

        Price Size System Requirements* Download Links
        Free Trial 4.35  MB RAM - 512 MB or More
         Full    1,412/- 4.35  MB Hard Disk - 1 GB or More
           - - Service Pack - 1 or More         -
           - -          -         -


                   Don't forget to share your experience. If any doubts feel free to ask.. तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. आणी अडचण उद्भवली तर येथे मांडा.. 

         बीटकॉईन – समज आणी गैरसमज

         बीटकॉईन – समज आणी गैरसमज
         आपण या आधीच्या दोन भागांमध्ये बीटकॉईनबद्दल माहिती घेतली, एव्हाना तुमचे बीटकॉईन खाते तयारही झाले असेल, आज आपण बीटकॉईनबद्दल सर्वसाधारणपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. बीटकॉईनबद्दल असलेले समज अधिक दृढ व्हावेत आणी गैरसमज दूर होण्यास मदत व्हावी, असा यामागे उद्देश आहे. तुम्ही जर बीटकॉईनबद्दलचे दोन्ही लेख वाचले नसतील तर बीटकॉईन बद्दल कल्पना येण्यासाठी ते अवश्य वाचा. इथे बीटकॉईनबद्दल सर्वसाधारणपणे विचाण्यात येणार्या प्रश्नांची उत्तरे दिली असली तरी आधीच्या लेखांमध्ये बऱ्यापैकी उत्तरे सापडतील.

          जर तुम्हाला या व्यतिरिक्त इतर प्रश्नांबद्दल उत्तर हवे असेल तर इथे जरूर मांडा, आम्ही किंवा संबंधित तज्ञ वाचक उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू, तत्पुर्वी हे भाग पहा         १) बीटकॉईनचा जनक कोण?
         - बीटकॉईनसारख्या आभासी चलनाचा उल्लेख सर्वप्रथम (Wei Dai) यांनी १९९८ मध्ये त्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये केला होता, ज्यात त्यांनी सुरक्षित अशा चलनाच्या नव्या विकेंद्रित स्वरूपाबाबत कल्पना मांडली होती, पण बीटकॉईन अस्तित्वात आणण्याचे श्रेय सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) या अज्ञात संगणक तज्ञाला जाते, ज्याने २००९ मध्ये बीटकॉईन जगापुढे आणले, पण हेही तितकेच खरे आहे ही व्यक्ती कधीही प्रत्यक्षपणे जगापुढे आली नाही आणी २०१० नंतर सातोशीने गेविन एड्रेंसेन (Gavin Andressen) या संगणक तज्ञाकडे बीटकॉईनचा पसारा सोपवून या प्रकल्पातून निरोप घेतला, आज गेविन बीटकॉईन फौंडेशन (Bitcoin Foundation) मध्ये प्रमुख व्यवस्थापक म्हणून काम पहात आहे आणी सातोशी बद्दल कोणाकडेही माहिती नाही.

         २) बीटकॉईन म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे का?
         - अनेक लोक आज बीटकॉईनकडे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून बघत आहेत, पण जर एखादी व्यक्ती बीटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असेल तर अशा गोष्टी फक्त धोकादायक गुंतवणूक म्हणून पाहायला हव्यात, कारण हे चलन कोणत्याही केंद्रित संस्थेकडून किंवा सरकारकडून नियंत्रित होत नाही, त्यामुळे गुंतवणुकीतून अपेक्षित मोबदला मिळेल कि नाही हे वर्तवणे कठीण आहे. जाणकार, क्लिष्ट तांत्रिक बाबी, असुरक्षित चलन, अस्थिर किंमत अशा सगळ्या बीटकॉईन मध्ये सध्यातरी गुंतवणूक न करण्याचा सल्ला देतात.

         ३) बीटकॉईन म्हणजे फसवी स्कीम आहे का?
         - नाही, एखाद्या फसव्या स्कीम मध्ये स्कीम सुरु करणाऱ्यांचा हेतूच मुळात लुबाडणूक हा असतो, पण बीटकॉईनची सुरुवात एक पर्यायी चलनाच्या स्वरुपात झाली आहे त्यामुळे याला फसवी स्कीम  म्हणणे अयोग्य ठरेल, पण सध्या बीटकॉईनच्या उदयाचा काळ सुरु आहे आणी त्याबाबत आवश्यक तेवढ्या प्रमाणात जागरूकता निर्माण न झाल्यामुळे अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कोणीही, कोणाचीही फसवणूक करू शकतो.

         ४) बीटकॉईन कोणाला वापरता येतात?
         - आज या घडीला वैध बीटकॉईन (Bitcoins without hacking or cracking) वापरण्यापासून कोणाचीही अडवणूक करता येत नाही अर्थात मला, तुम्हाला किंवा चक्क अंडरवर्ल्डमधीलही कोणाला बीटकॉईन वापरण्यापासून रोखण्याची यंत्रणा आज अस्तित्वात नाही ज्याने याचा गैरवापर होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.

         ५) बीटकॉईनचे पाकीट चुकून डिलीट झाले तर?
         - तुमच्याकडे असलेले बीटकॉईनचे पाकीट जर चुकून डिलीट झाले तर त्यात असलेले बीटकॉईनसुद्धा एका अर्थी नष्ट होतात, हे म्हणजे राष्ट्रीय चलनांच्या बाबतीत नोटा हरवण्यासारखे आहे. तुम्ही तुमचे पाकीट सेवा पुरवठादाराकडून पुन्हा मिळवण्यात यशस्वी झालात तरच ते बीटकॉईन पुन्हा पाकिटात जोडले जातात, यात लक्षात घेण्यासारखा भाग असा की पाकीट डिलीट झाल्यावर बीटकॉईन त्यांच्या शृंखलेतून (Block) नष्ट होत नाहीत पण ते वापरण्यासाठी आवश्यक असणारा गुप्त कोड (Private Key) कोणालाच माहिती नसल्यामुळे ते खर्च करता येत नाही.

         ६) बीटकॉईन बेकायदेशीर आहेत का?
         - सध्यातरी कोणत्याही देशातील प्रशासनाने बीटकॉईन बेकायदेशीर ठरवलेले नाही, पण चीन, थायलंड सारख्या देशांनी बीटकॉईनच्या वापरावर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. इतरही अनेक देश अशा प्रकारे आभासी चलनांच्या वापरावर बंधने आणू शकतात.

         ७) पारंपारिक चलनांच्या तुलनेत बीटकॉईनची किंमत कशी ठरवली जाते?
         - आपण या विषयी गेल्या भागात वाचले, इथे उदाहरण पाहुयात – जर आज एकाच वेळी जगातील बहुतांश लोकांनी बीटकॉईन वापरायला सुरुवात केली तर बीटकॉईनची जागतिक बाजारातील किंमत देखील त्याच प्रमाणात वाढेल आणी जर आज बीटकॉईन वापरत असलेल्या बहुतांश वापरकर्त्यांनी बीटकॉईन वापरणे बंद केले तर बीटकॉईनच्या किमतीत त्याच प्रमाणात घट होईल. काही नियम, अपवाद वगळता हे उदाहरण प्रमाण मानायला हरकत नाही.

         ८) बीटकॉईनचा प्रयोग हा सध्या लोकप्रिय असला तरी तो अपयशी होऊ शकतो का?
         - हो, आतापर्यंतच्या इतिहासात आपल्याला झिम्बावेयन डॉलर, जर्मन मार्क सारखी चलनं अपयशी होण्याची उदाहरणे सापडतील, बीटकॉईन देखील अपयशी होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकणार नाही, पण आधी झालेल्या चुका बीटकॉईन मध्ये कटाक्षाने टाळण्यात आल्या आहेत, तरीदेखील तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे बीटकॉईनचा प्रयोग अपयशी होऊ शकतो.

         ९) बीटकॉईन पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी काय आवश्यक आहे?
         - तुम्ही जर पेपल वापरत असाल तर तुम्हाला ज्याप्रमाणे पेपल खात्याशी सलग्न ई-मेल पत्ता वापरून पैसे स्वीकारता किंवा पाठवता येतात (भारतात पेपलद्वारे पैसे पाठवता येत नाहीत)  त्याचप्रमाणे बीटकॉईनचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बीटकॉईनच्या पाकिटाशी सलग्न पत्ता दिला जातो जो ई-मेल पत्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा असतो (उदाहरणार्थ - 1AGNa15ZQXAZUgFiqJ2i7Z2DPU2J6hW62i) लक्षात ठेवायला कठीण असला तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून असा पत्ता आवश्यक आहे.

         १०) बीटकॉईन वापरून काय विकत घेता येईल?
         - सध्या अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या संकेतस्थळांनी बीटकॉईन स्वीकारण्याबाबत रस दाखवला नसला तरीही इतर अनेक संकेतस्थळांवर बीटकॉईन स्वीकारले जातात अशा संकेस्थळांवर उपलब्ध असलेल्या गोष्टी/सेवा तुम्ही विकत घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी बीटकॉईनचा पर्यायी चलन म्हणून स्वीकार केला आहे अशा ठिकाणीही तुम्ही बीटकॉईन खर्च करू शकता. भविष्यात जर हा प्रयोग यशस्वी झाला तर अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी अनेक संकेतस्थळे बीटकॉईनचा स्वीकार करतील हे नक्की.

         ११) तुमचे बीटकॉईन सुरक्षित कसे ठेवाल?
         - तुम्ही जर एकापेक्षा अधिक बीटकॉईन्सचे व्यवहार वारंवार करत असाल तर बीटकॉईन ठेवण्यासाठी ऑफलाइन पाकीट वापरणे कधीही चांगले, पण ऑफलाइन पाकीट वापरताना तुमचा एन्टीवायरस सतत अद्ययावत ठेवा आणी संगणकावरील माहिती पुसली जाणार नाही (फॉरर्मेट) याची काळजी घ्या. बीटकॉईन ऑनलाइन किंवा ऑफलाइन वापरताना तुमचे संकेताक्षर (पासवर्ड) अधिकाधिक कठीण आणी गुंतागुंतीचा पण तुम्हाला सदैव लक्षात राहील असा निवडा.

         १२) बीटकॉईन ऑनलाईन गुंतवल्यावर अपेक्षित परिणाम मिळतील का?
         - तुम्ही ऑनलाईन बीटकॉईन गुंतवल्यावर मिळणारे परिणाम हे गुंतवणुकीचे ठिकाण, आणी समोरील व्यक्ती/कंपनी यावर अवलंबून असतात, त्यामुळे याबद्दल कोणतीही हमी देता येत नाही, शिवाय समोरील व्यक्ती/कंपनीचा हेतू देखील तितकाच महत्वाचा आहे. सर्व बाबींचा विचार करून, ऑनलाइन चर्चा मसलती करून/पाहून निर्णय घेणे कधीही श्रेयस्कर ठरते.

                   आज बीटकॉईन हे एक उदयोन्मुख चलन आहे, काहींच्या मते बीटकॉईन जागतिक आर्थिक व्यवस्थेला खिळखिळी करू शकतात तर काहींच्या मते बीटकॉईन पारंपारिक चलनांच्या त्रुटींवर एक किफायतशीर आणी प्रभावी उपाय आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की कोणीही तज्ञ खात्रीशीरपणे बीटकॉईनचे भविष्य वर्तवू शकत नाही. माझ्या मते (तज्ञ नव्हे) आवश्यक पण तरीही व्यवहार्य कायद्यांचा आणी बीटकॉईनचा सुबक मेळ घातला तर जागतिकीकरणाच्या समुद्रात आंतरजालाच्या बोटीतून सुरक्षित जलविहाराचा आनंद आपणा सर्वांनाच घेता येईल.
                   बीटकॉईन अधिक सुरक्षित कसे करता येईल? बीटकॉईन वापरण्यासाठी नियम/कायदे असावेत का? तुम्हाला काय वाटते? बीटकॉईनच्या वापरामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील का? मांडा तुमची मते..

         Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू

         आपण आधुनिक जगातील इंटरनेटच्या नव्या चलनाबद्दल जाणून घेतले, आज आपण बीटकॉईनच्या तांत्रिक बाबींबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. बीटकॉईन हे चलन विकेंद्रित असल्याकारणाने बीटकॉईन्सच्या जागतिक व्यवहारांसाठी एक सुरक्षेचा उपाय म्हणून त्याच्या शक्यतो प्रत्येक व्यवहाराची इंटरनेटवर सर्वांसाठी खुली असलेली नोंद करणे आवश्यक बनले ज्यामुळे गैरमार्गाने एकच बीटकॉईन एकाच व्यक्तीकडून दोनदा वापरला जाण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध आला आणी त्याचबरोबरीने ठराविक माहितीचीच नोंद होत असल्याकारणाने वापरकर्त्यांची सुरक्षितता जपली जाऊ लागली.


         Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू


         बीटकॉईनची नोंदवही

         बीटकॉईनद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार (Block) ब्लॉक नावाच्या फाईलमध्ये नोंदवले जातात, आणी इंटरनेटवर कोणीही हे ब्लॉक पाहू शकतात आणी सर्व ब्लॉक एका शृंखलेत जोडलेले आहेत, कोणताही व्यवहार घडल्यावर सर्वसाधारणतः ६ ब्लॉक्स मध्ये नोंद झाल्याशिवाय तो व्यवहार प्रलंबित ठेवण्यात येतो. सध्या इंटरनेटवर २,९०,००० ब्लॉक्स आहेत आणी ज्यात दर १० मिनिटांनी भर पडत आहे. इंटरनेट ब्लॉक तयार करण्याच्या पद्धतीला (Mining)  माइनिंग म्हणजेच खाणकाम अशी संज्ञा वापरली आहे. एखाद्या व्हिडियो गेम प्रमाणे ही यंत्रणा काम करते, बीटकॉईनचा नवीन ब्लॉक तयार करण्यासाठी एक कठीण गणित सोडवावे लागते ज्यामुळे तो ब्लॉक खुला होऊ शकतो आणी खुला झाल्यावर तो बीटकॉईनच्या शृंखलेत जोडला जातो, गणित सोडवणार्याला बक्षीस म्हणून त्या ब्लॉकमध्ये असलेले २५ बीटकॉईन मिळतात, पण हि गणिते सोडवणे इतके सोपे नसते त्यामुळेच हि गणिते अनेक लोक एकत्र येउन  एकीचे बळ अवलंबत सोडवतात ज्याला  (Pooled Mining) 'पुल्ड माइनिंग' असे म्हणतात, आणि गणित सुटल्यावर बक्षीस आपापसात वाटून घेतले जाते, गणित सुटणे हे काही प्रमाणात संगणकाच्या क्षमतेवर अवलंबून असते.  दर २,१०,००० ब्लॉक्स तयार झाल्यानंतर त्यात असलेल्या बीटकॉईनची किंमत अर्धी होते, सध्याचा वेग पहाता हे व्हायला ४ वर्षांचा कालावधी लागतो. इंटरनेटवर बीटकॉईन ब्लॉक्सच्या संख्येला कोणतेही बंधन नाही पण बीटकोईनच्या संख्येला बंधन घालण्याचे मुख्य कारण म्हणजे चलनाचा एका ठराविक मर्यादेपर्यंतच नियंत्रित पुरवठा व्हावा म्हणजे राष्ट्रीय चलनांचे आणी बीटकॉईनचे स्थैर्य आणी मुल्य धोक्यात येणार नाही, म्हणजे एकूण बीटकॉईन्सची संख्या २१ दशलक्षाहून अधिक कधीही होणार नाही.

         बीटकॉईन माइनिंग बद्दल अधिक माहिती देणारा हा माहितीपट


         बीटकॉईन माइनिंगसाठी आवश्यक असणार्या हार्डवेयर बद्दल अधिक माहिती देणारा हा माहितीपट

         बीटकॉईनची किंमत 

         बीटकॉईन कोणत्याही केंद्रित व्यवस्थेकडून नियंत्रित होत नाही त्यामुळे बीटकॉईनची मागणी आणी पुरवठा या तत्वावर राष्ट्रीय चलनांच्या तुलनेत किंमत ठरवली जाते, आणी ती नेहेमीच एकीय लवचिक असते, म्हणजेच मागणी वाढली की किंमत वाढते आणी मागणी घटली की किंमत घसरते असा थेट सबंध आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय चलनांच्या बदल्यात बीटकॉईन विकत घेऊ शकते किंवा विकू शकते. भारतातही या संकेतस्थळावर भारतीय रुपया वापरून बीटकॉईनची खरेदी विक्री करता येते, सध्या एका बीटकॉईनची किंमत ४०,००० इतकी आहे आणी यात मागणी आणी पुरवठ्याप्रमाणे बदल होत राहतात त्यामुळे पुढील काळात किमतीतील बदल कोणीही वर्तवू शकत नाही, म्हणजे शक्यता ही आहे की एका बीटकॉईनची किंमत १,००,००० रुपयांच्या वर जाईल पण शक्यता हीही आहे की एका बीटकॉईनची किंमत १ रुपयापेक्षा कमी होईल. किमतीची अस्थिरता हा चलनाचा स्थायीभाव आहे, बीटकॉईनदेखील त्याला अपवाद नाही.

         बीटकॉईनचे व्यवहार

         बीटकॉईनचे व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे बीटकॉईनचे पाकीट असणे आवश्यक आहे (जे तुम्ही विनामुल्य तयार करू शकता) तुम्ही पेपल प्रमाणे व्यवहारांसाठी तुमचा ई-मेल पत्ता वापरू शकत नाही, बीटकॉईनच्या व्यवहारांसाठी प्रत्येक पाकिटासाठी एक विशिष्ठ अद्वितीय क्रमांक असतो जो तुम्हाला संबंधित सेवा पुरवठादाराकडून मिळतो (उदाहरणार्थ  - 1JSVixNRgqyc3prJpjqk8cB14KQW7VikYs). बीटकॉईन तुमच्या पाकिटात स्वीकारण्यासाठी बीटकॉईन पाठवणार्याकडे हा क्रमांक असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तुमच्या पाकिटातून बीटकॉईन पाठवताना स्वीकाणार्याच्या बीटकॉईन पाकिटाचा क्रमांक तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. साधारण चलनाला पर्याय म्हणून बीटकॉईनचा फायदा होत असला तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चलनांचे काही प्रमाणात नुकसान होत असते.

         बीटकॉईन कमावण्याच्या कायदेशीर पद्धती

         १) (Mining)  माइनिंग – सध्यातरी संपुर्ण २१ दशलक्ष बीटकॉईन अस्तित्वात आलेले नाहीत त्यामुळे खाणकाम करून बीटकॉईन कमावू शकता. खाणकाम करण्यासाठी अधिक माहिती माइनिंग संदर्भातील वरील माहितीपटात मिळेल.

         २) दान – तुम्ही एखादे समाजोपयोगी काम करत असाल तर तुम्ही तुमचा बीटकॉईन पाकीट क्रमांक कामाबरोबर देऊ शकता आणी दान करण्याबद्दल सुचवू शकता.

         ३) सेवा – तुम्ही इंटरनेटवर एखादी सेवा पुरवत असाल तर त्याबदल्यात बीटकॉईन स्वीकारण्याचा पर्याय अपरिहार्यता असल्यास उपयोगी पडू शकतो, पण राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून प्रमाणाबाहेर वारंवार बीटकॉईन वापरणे शक्यतो टाळा.

         ४) जाहिराती – काही संकेतस्थळे जाहिराती पाहण्यासाठी बीटकॉईन देतात, त्यांचा वापर करूनही तुम्ही बीटकॉईन कमावू शकता. जाहिराती पाहिल्यावर बीट कॉईन देणारी संकेतस्थळे. तुम्ही ही बुकमार्क करून ठेऊ शकता.

         बीट व्हिजिटर - www.tinyurl.com/BitVisitor-Portal
         बीट क्रेट - www.tinyurl.com/Bitcrate-Portal

         ५) सावकारी – तुम्ही तुमचे बीटकॉईन कर्ज रूपी इतरांना देऊ शकता, विश्वासू व्यक्तीबरोबर थेट व्यवहार करू शकता किंवा खालील संकेतस्थळावर कर्ज देऊ शकता त्याचबरोबर संकेतस्थळावर  कर्ज घेण्याचीही सोय आहे.

         बीटबॉंड - www.tinyurl.com/Bitbond-Portal
         याशिवाय इतरही मार्गाने तुम्ही बीट कॉईन कमावू शकता पण ते मार्ग कायदेशीर असतील याची दक्षता घ्या, बीटकॉईन कमावण्याचे ऑनलाइन लॉटरीसारखे पर्याय इंटरनेटवर उपलब्ध असले तरी भारतात अशा गोष्टींना बंदी आहे, दोषींना आर्थिक दंड किंवा कारावास किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. पुढच्या भागात आपण बीटकॉईनबद्दल प्रश्नोत्तरे पाहुयात ज्यामुळे बीटकॉईनबद्दल असणारे समज अधिक दृढ होतील आणी गैरसमज दूर होतील.

         Bitcoin – इंटरनेटवर वापरण्यासाठी नवे आभासी चलन

         आज अस्तित्वात असलेले सर्वात महागडे चलन कोणते असा प्रश्न विचारला तर सहाजिकच डॉलर्स,पौंड अशी उत्तरे बहुतेक लोक देतील. इंटरनेटवर कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आज अशाच पारंपारिक चलनांचा वापर होतो, पण लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे आणी आपल्याला इंटरनेटवर व्यवहार करताना BitCoin या नव्या चलनाचा वापर करणे शक्य होणार आहे.


         Bitcoin – इंटरनेटवर वापरण्यासाठी नवे चलन

         Satoshi Nakamoto (सातोशी नाकामोटो) या संगणक तज्ञाने बीटकॉईनचे तंत्रज्ञान २००९ मध्ये अस्तित्वात आणले आणी हळूहळू ह्याचा वापर वाढला. आजमितीस इंटरनेटवर १०.७१ दशलक्ष बीटकॉईन्स अस्तित्वात आहेत आणी ज्यांची किंमत २१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास १३ अब्ज रुपये इतकी आहे आणी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. चलनाचे विकेंद्रीकरण करून इंटरनेटवरील व्यवहारांसाठी एक समान चलन आणणे हे बीटकॉईनच्या अस्तित्वाचे मुख्य कारण आहे. अनेक देशातील नागरिकांनी बीटकॉईन वापरण्यास सुरुवात केली आहे परंतु काही ठिकाणी त्याचा राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून वापर केला जात आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेसमोरचे हे नवे संकट येण्यापूर्वीच त्याला थोपवण्यासाठी काही देशांनी कंबर कसली आहे, चीनने राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून बीटकॉईन वापरण्यावर निर्बंध आणले आहेत, अमेरिकेच्या FBI या गुप्तचर यंत्रणेने नुकतेच २०१३ साली Silk Road या ऑनलाइन काळ्या बाजार करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करत २८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे सुमारे १,४४,००० बीटकॉईन्स हस्तगत केले. मध्यंतरी भारतातील रिझर्व बँकेनेही अशा प्रकारचे 'आभासी चलन' वापरताना परवानगी घेण्यासंदर्भात पत्रक जारी केले होते ज्यामुळे भारतात बीटकॉईन्स ची उलाढाल करणारे Buysellbitco.in हे संकेतस्थळ काही काळ बंद होते. या बाबत अधिक माहिती इथे मिळेल.

         बीटकॉईन आणी त्याची किंमत

         आजचा विचार केला तर एका बीट कॉईनची किंमत ही ६४४ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४०,००० रुपयांच्या आसपास आहे, पण इंटरनेटवर सर्वच व्यवहार ह्या किमतीत होत नाहीत त्यामुळे बीटकॉईनची लहान लहान भागात विभागणी करण्यात आली आहे.

         1 BTC = १ बीट कॉईन 0.01 BTC = 1 cBTC = १ सेंटी बीट कॉईन 0.01 BTC = 1 mBTC = १ मिली बीट कॉईन 0.000 001 BTC BTC = 1 μBTC = १ मायक्रो बीट कॉईन 0.000 000 01 BTC = १ सातोशी (याला जनकाचे नाव देण्यात आले आहे) 

         बीटकॉईन कसे वापरावे?

         बीटकॉईन वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बीटकॉईन ठेवण्यासाठी पाकीट असणे आवश्यक आहे जे तुम्ही ऑनलाइन तयार करू शकता. ऑनलाइन पाकीट तीन प्रकारात तयार करता येते. भारतात सध्यातरी बीटकॉईन वापरण्यावर कोणतेही जाचक निर्बंध नाहीत आणी बीटकॉईनसाठी खाते उघडणे/वापरणे सुध्दा विनामुल्य आहेत, शिवाय तुम्ही एका खात्यामध्ये एकापेक्षा अधिक पाकिटे विनामुल्य तयार करू शकता.


         • वेब – म्हणजे वेबसाईट वापरून तुम्ही तुमचे पाकीट तयार करू/वापरू शकता. वेब द्वारे बीटकॉईन वापरण्यासाठी संकेतस्थळे..

         1. ब्लॉकचेन - https://blockchain.info/wallet/new
         2. कॉईनबेस - https://coinbase.com/signup
         3. कॉईनजार - https://secure.coinjar.com/users/sign_up
         4. कॉईनपंक - https://coinpunk.com/
         • सॉफ्टवेयर – म्हणजेच तुमच्या संगणकावर संगणक प्रणाली प्रस्थापित करून तुम्ही तुमचे पाकीट तयार करू/वापरू शकता. सॉफ्टवेयर द्वारे बीटकॉईन वापरण्यासाठी संकेतस्थळे..

         1. बीटकॉईन QT - http://bitcoin.org/en/download
         2. आरमोरी - https://bitcoinarmory.com/
         3. मल्टीबीट - https://multibit.org/
         • मोबाईल फोन – म्हणजेच तुम्ही मोबाईलवर एप्सच्या  माध्यमातून तुमचे पाकीट तयार करू/वापरू शकता. सध्या Android आणी Apple या दोन फोनसाठी सेवा उपलब्ध आहे. फोनद्वारे द्वारे बीटकॉईन वापरण्यासाठी संकेतस्थळे..

         1. ब्लॉकचेन - https://blockchain.info/wallet
         2. कॉईनजार - https://www.coinjar.com/
         3. कॉईनपंक - http://coinpunk.org/

         संगणक/इंटरनेट सारख्या शोधांप्रमाणेच हाही एक जग बदलून टाकणारा शोध आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,पण जरी आज याचा जगभर वापर सुरु असला तरीही ह्यात आज असंख्य धोके आहेत हेही तितकेच सत्य आहे, कालानुरूप यात बदल होत सुधारणा होतील अशी अपेक्षा करुयात.

         बीटकॉईन बद्दल माहिती देणारा हा माहितीपट

         बीटकॉईन तयार कसे होतात, त्यांची जागतिक बाजारातील किंमत काय, त्यात बदल कसे होतात, इंटरनेट/संगणक वापरून बीटकॉईन कसे कमावता येतात, बीटकॉईन तुमच्या खात्यामध्ये कसे स्वीकारावेत, कसे खर्च करावेत याचे त्याचप्रमाणे याचे इतरही पैलू आपण पुढील भागात पाहुयात

         .         How Do I Solve 800+ Windows XP Problems Easily

         Microsoft is a leading brand in computer operating systems has launched windows XP on August 24, 2001, and it is still being used by number of users worldwide ( around 40% of total on desktops & laptops ), although Microsoft has introduced Windows 7,8 and in progress of Windows 9 most of the users love XP than the any latest version. There is one sad news for xp lovers that Microsoft is going to close technical support for Windows xp with effect from April 8, 2014.  Users can not update their service packs, system or Microsoft Security Essentials.

         How do I Solve 800+ Windows XP Problems Easily


         So if you are an existing windows XP user then you will have to choose one option.
         • Use windows XP without official technical support
         • Upgrade to newer versions of Windows such as 7,8
         I am sure that most of the XP lovers will choose to stay with windows XP without official technical support. Here is one good news for them, you can encounter some issues from the XP system if occurred with the help of default registry files. I use these files whenever I found any serious issue in my system. Registry files are nothing but the default files from system which will restore the system components having issues.
         Example:-  If my taskbar is not functioning in XP then I will download the default taskbar file (which is taskbar registry file with .reg extension) and I will install that file in my system. That file will restore my taskbar, so my taskbar will go to the default stage and it will function properly.
         You can find 800+ registry files on ‘Kelly’s Korner’ with the related information.  If you are not getting appropriate registry file then you will surely get that from other sites, Google them. You can also ask for the help in various forums, but be careful before implementing any advice.

         PRECAUTIONS -  Registry files are system files and they do make certain changes in your system registry so some times your antivirus may block them saying those are malicious files, if you have Script Safe feature enabled. These files are not malicious in nature but antivirus blocks them because they make certain registry changes, this is normal, don’t panic. Make sure that you have latest system restore point created before installing any registry file.