Archive Pages Design$type=blogging


Olx, Quikr सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती देताना

सध्या आपण आपल्याकडच्या वापरलेल्या वापरलेल्या (Second Hand) वस्तु विकताना त्याबद्दल माहिती देताना वेगवेगळ्या माध्यमातुन त्याची जाहिरात करतो. आपल्याकडील वस्तुंबाबत इंटरनेटवर व्यवहार करण्याचा नवीन पर्यायही उदयास येताना दिसत आहे यात Olx, Quikr सारख्या विनामुल्य जाहिराती करणाऱ्या संकेतस्थळांवर दिवसागणीक जाहिरातींचा खच पडत असतो. तुमची जाहिरात परिपूर्ण करण्यासाठी मदत करणारा हा लेख.


सध्या आपण आपल्याकडच्या वापरलेल्या वापरलेल्या (Second Hand) वस्तु विकताना त्याबद्दल माहिती देताना वेगवेगळ्या माध्यमातुन त्याची जाहिरात करतो, त्याची व्याप्त्ती ज्या-त्या माध्यमावर अवलंबुन असते. वस्तुंच्या किमतीनुसार जाहिरात कुठे आणी कशी करायची हे ठरत असते. सध्या आपल्याकडील वस्तुंबाबत इंटरनेटवर व्यवहार करण्याचा नवीन पर्यायही उदयास येताना दिसत आहे यात Olx, Quikr सारख्या विनामुल्य जाहिराती करणाऱ्या संकेतस्थळांवर दिवसागणीक जाहिरातींचा खच पडत असतो. भारतातही अशा प्रकारे जाहिरात करणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकुणच इंटरनेटच्या फायद्या तोट्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण होत असल्याची लक्षणे यानिमित्ताने दिसत आहेत.

Olx, Quikr सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती देताना



विनामुल्य जाहिराती करणाऱ्या संकेतस्थळांवर तुमच्याबरोबरच इतर अनेक व्यक्तीदेखील त्यांच्याकडील वस्तुंची जाहिरात करतात यात वस्तुंमध्ये साम्य असले तरीही जाहिराती पाहणारे स्वाभाविकपणे अधिकाधिक चांगली वस्तु मिळावी यासाठी प्रयत्न करतात. तज्ञांच्या मतानुसार, इंटरनेटवर ज्या जाहिरातींबरोबर वस्तुंसंदर्भात छायाचित्रे किंवा चलचित्रे जोडलेली असतात आणी वस्तुंबाबत नेमकी माहिती दिलेली असते त्या जाहिरातदारांना इतरांच्या तुलनेत अधिक पसंती मिळते, याचा सरळ अर्थ असा कि ज्या जाहिराती माहितीपुर्ण आणी आकर्षक असतात त्या जाहिरातदारांना व्यवहारासाठी अग्रक्रम दिला जातो.



माहितीपुर्ण + आकर्षक = व्यवहारात अग्रक्रम


तुमची जाहिरात परिपूर्ण करण्यासाठी :



१) लक्षवेधी शीर्षक –
तुमच्या कोणत्याही वस्तुची जाहिरात करताना त्याचे शीर्षक जितके आकर्षक असते तेवढे त्याकडे जास्त लक्ष वेधले जाते, शीर्षक लक्षवेधी करताना त्याची वस्तुशी समर्पकता कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. जे लक्षवेधी शीर्षक कमी शब्दात जास्त माहिती देते अशा जाहिराती पहिले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

२) मुद्देसूद विवरण –
तुमच्या वस्तुच्या नावापासून ते त्याच्या किमतीपर्यंत शक्य तितकी अचुक माहिती द्यावी आणी अनावश्यक माहिती देणे टाळावे. उदाहरणार्थ संगणकाची जाहिरात देत असाल तर संगणकाची स्थिती, विकत घेतल्याची तारीख (महिना/वर्ष), अंतर्गत भागांची माहिती (रॅम, हार्डडिस्क, प्रोसेसर), मॉनिटरचा प्रकार इत्यादी. जर तुम्ही तुमच्या संगणकावरील प्रस्थापित संगणक प्रणालींची माहिती दिली तर ती अधिक उपयुक्त ठरू शकते म्हणजेच तुमच्या संगणकावर फोटोशॉप प्रणाली प्रस्थापित असेल एखाद्या व्यक्तीला फोटोशॉप वापरण्यासाठी संगणक हवा असेल तर तुमच्या बरोबर व्यवहार करून त्या व्यक्तीचा आर्थिक आणी तांत्रिक फायदा होऊ शकतो.

३) छायाचित्रे/चलचित्रे –
जाहिरातीमध्ये संबंधित छायाचित्रे/चलचित्रे जोडणेही जाहिरात जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उपयुक्त ठरते तसेच यामुळे जाहिरात वाचणाऱ्याला वस्तुबद्दल अधिक माहिती मिळते. जर वस्तुची छायाचित्रे/चलचित्रे काढणे शक्य नसेल तर इंटरनेटवर तुमच्या वस्तुशी साधर्म्य साधणारी छायाचित्रे/चलचित्रे शोधुन ती जोडावी आणी ‘नुमना छायाचित्रे/चलचित्रे’ असा स्पष्ट उल्लेख करावा.

४) सुरक्षितता –
जाहिरात देताना शक्यतो तुमची वयक्तिक माहिती देणे टाळावे म्हणजे तुमचा पत्ता देताना फक्त एरिया आणी शहर आणी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक इतकीच माहिती द्यावी. तुमची वयक्तिक माहिती सरसकट सर्वांना देण्याएवजी व्यवहारासाठी इच्छुक व्यक्तींनाच द्यावी यामुळे तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल. व्यवहार पुर्ण झाल्यावर शक्य तितक्या लवकर तुमची जाहिरात सदर संकेतस्थळांवरून काढुन टाकावी यासाठी त्या संकेतस्थळांवर खाते असल्यास ही प्रक्रिया जलद गतीने आणी सोप्या पद्धतीने होण्यास मदत होते.

५) आर्थिक बाबींचा स्पष्ट उल्लेख –
तुमची जाहिरात देताना तुमच्या वस्तुबद्दल असलेल्या अपेक्षित किमतीबद्दल पुर्वकल्पना देणे म्हणजे एका प्रकारे वेळेची बचत करणे होय. तुम्ही आर्थिकदृष्ट्या व्यवहार करताना अधिक जागरूक असणे आवश्यक आहे, जेणेकरून इंटरनेटचा सुयोग्य वापर करून अर्थप्राप्ती करता येईल. ज्याप्रमाणे फसव्या जाहिरातींपासुन आपण सावध रहायला हवे त्याचप्रमाणे अशा जाहिराती न करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही किती आणी कशा प्रकारे पैसे स्वीकारणार आहात याबद्दल माहिती दिली तर तुमच्या बरोबर केल्या जाणाऱ्या संभाव्य व्यवहारातील आर्थिक बाबींबद्दल समोरील व्यक्तीला कल्पना येते.


अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जाहिराती परिपूर्ण आणी सुरक्षित पण तरीही फायदेशीर ठरण्यासाठी प्रयत्न करू शकता.
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: Olx, Quikr सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती देताना
Olx, Quikr सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती देताना
सध्या आपण आपल्याकडच्या वापरलेल्या वापरलेल्या (Second Hand) वस्तु विकताना त्याबद्दल माहिती देताना वेगवेगळ्या माध्यमातुन त्याची जाहिरात करतो. आपल्याकडील वस्तुंबाबत इंटरनेटवर व्यवहार करण्याचा नवीन पर्यायही उदयास येताना दिसत आहे यात Olx, Quikr सारख्या विनामुल्य जाहिराती करणाऱ्या संकेतस्थळांवर दिवसागणीक जाहिरातींचा खच पडत असतो. तुमची जाहिरात परिपूर्ण करण्यासाठी मदत करणारा हा लेख.
http://4.bp.blogspot.com/-L9txyUMrh7c/UfQZf7vSkpI/AAAAAAAAAxA/eXCBsZMo_Gg/s400/Olx,+Quikr+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE.jpg
http://4.bp.blogspot.com/-L9txyUMrh7c/UfQZf7vSkpI/AAAAAAAAAxA/eXCBsZMo_Gg/s72-c/Olx,+Quikr+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2013/07/while-posting-advt-on-websites.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2013/07/while-posting-advt-on-websites.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte