Archive Pages Design$type=blogging


Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू

जागतिक बाजारातील किंमत काय, त्यात बदल कसे होतात, इंटरनेट/संगणक वापरून बीटकॉईन कसे कमावता येतात, बीटकॉईन तुमच्या खात्यामध्ये कसे स्वीकारावेत, कसे खर्च करावेत याचे त्याचप्रमाणे याचे इतरही पैलूंबद्दल या लेखात माहिती मिळेल.

आपण आधुनिक जगातील इंटरनेटच्या नव्या चलनाबद्दल जाणून घेतले, आज आपण बीटकॉईनच्या तांत्रिक बाबींबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. बीटकॉईन हे चलन विकेंद्रित असल्याकारणाने बीटकॉईन्सच्या जागतिक व्यवहारांसाठी एक सुरक्षेचा उपाय म्हणून त्याच्या शक्यतो प्रत्येक व्यवहाराची इंटरनेटवर सर्वांसाठी खुली असलेली नोंद करणे आवश्यक बनले ज्यामुळे गैरमार्गाने एकच बीटकॉईन एकाच व्यक्तीकडून दोनदा वापरला जाण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध आला आणी त्याचबरोबरीने ठराविक माहितीचीच नोंद होत असल्याकारणाने वापरकर्त्यांची सुरक्षितता जपली जाऊ लागली.


Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू


बीटकॉईनची नोंदवही

बीटकॉईनद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार (Block) ब्लॉक नावाच्या फाईलमध्ये नोंदवले जातात, आणी इंटरनेटवर कोणीही हे ब्लॉक पाहू शकतात आणी सर्व ब्लॉक एका शृंखलेत जोडलेले आहेत, कोणताही व्यवहार घडल्यावर सर्वसाधारणतः ६ ब्लॉक्स मध्ये नोंद झाल्याशिवाय तो व्यवहार प्रलंबित ठेवण्यात येतो. सध्या इंटरनेटवर २,९०,००० ब्लॉक्स आहेत आणी ज्यात दर १० मिनिटांनी भर पडत आहे. इंटरनेट ब्लॉक तयार करण्याच्या पद्धतीला (Mining)  माइनिंग म्हणजेच खाणकाम अशी संज्ञा वापरली आहे. एखाद्या व्हिडियो गेम प्रमाणे ही यंत्रणा काम करते, बीटकॉईनचा नवीन ब्लॉक तयार करण्यासाठी एक कठीण गणित सोडवावे लागते ज्यामुळे तो ब्लॉक खुला होऊ शकतो आणी खुला झाल्यावर तो बीटकॉईनच्या शृंखलेत जोडला जातो, गणित सोडवणार्याला बक्षीस म्हणून त्या ब्लॉकमध्ये असलेले २५ बीटकॉईन मिळतात, पण हि गणिते सोडवणे इतके सोपे नसते त्यामुळेच हि गणिते अनेक लोक एकत्र येउन  एकीचे बळ अवलंबत सोडवतात ज्याला  (Pooled Mining) 'पुल्ड माइनिंग' असे म्हणतात, आणि गणित सुटल्यावर बक्षीस आपापसात वाटून घेतले जाते, गणित सुटणे हे काही प्रमाणात संगणकाच्या क्षमतेवर अवलंबून असते.  दर २,१०,००० ब्लॉक्स तयार झाल्यानंतर त्यात असलेल्या बीटकॉईनची किंमत अर्धी होते, सध्याचा वेग पहाता हे व्हायला ४ वर्षांचा कालावधी लागतो. इंटरनेटवर बीटकॉईन ब्लॉक्सच्या संख्येला कोणतेही बंधन नाही पण बीटकोईनच्या संख्येला बंधन घालण्याचे मुख्य कारण म्हणजे चलनाचा एका ठराविक मर्यादेपर्यंतच नियंत्रित पुरवठा व्हावा म्हणजे राष्ट्रीय चलनांचे आणी बीटकॉईनचे स्थैर्य आणी मुल्य धोक्यात येणार नाही, म्हणजे एकूण बीटकॉईन्सची संख्या २१ दशलक्षाहून अधिक कधीही होणार नाही.

Sponsors : Bitcoincasino
बीटकॉईन माइनिंग बद्दल अधिक माहिती देणारा हा माहितीपट






बीटकॉईन माइनिंगसाठी आवश्यक असणार्या हार्डवेयर बद्दल अधिक माहिती देणारा हा माहितीपट





बीटकॉईनची किंमत 

बीटकॉईन कोणत्याही केंद्रित व्यवस्थेकडून नियंत्रित होत नाही त्यामुळे बीटकॉईनची मागणी आणी पुरवठा या तत्वावर राष्ट्रीय चलनांच्या तुलनेत किंमत ठरवली जाते, आणी ती नेहेमीच एकीय लवचिक असते, म्हणजेच मागणी वाढली की किंमत वाढते आणी मागणी घटली की किंमत घसरते असा थेट सबंध आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय चलनांच्या बदल्यात बीटकॉईन विकत घेऊ शकते किंवा विकू शकते. भारतातही या संकेतस्थळावर भारतीय रुपया वापरून बीटकॉईनची खरेदी विक्री करता येते, सध्या एका बीटकॉईनची किंमत ४०,००० इतकी आहे आणी यात मागणी आणी पुरवठ्याप्रमाणे बदल होत राहतात त्यामुळे पुढील काळात किमतीतील बदल कोणीही वर्तवू शकत नाही, म्हणजे शक्यता ही आहे की एका बीटकॉईनची किंमत १,००,००० रुपयांच्या वर जाईल पण शक्यता हीही आहे की एका बीटकॉईनची किंमत १ रुपयापेक्षा कमी होईल. (Update -आज दिनांक ६ नोव्हेंबर २०१४ ह्या दिवशी एका बिटकॉईनची किंमत २०,००० रुपये आहे, यापुढे देखील किमतीमध्ये असे मोठे चढ-उतार होणे शक्य आहे. .) किमतीची अस्थिरता हा चलनाचा स्थायीभाव आहे, बीटकॉईनदेखील त्याला अपवाद नाही.

बीटकॉईनचे व्यवहार

बीटकॉईनचे व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे बीटकॉईनचे पाकीट असणे आवश्यक आहे (जे तुम्ही विनामुल्य तयार करू शकता) तुम्ही पेपल प्रमाणे व्यवहारांसाठी तुमचा ई-मेल पत्ता वापरू शकत नाही, बीटकॉईनच्या व्यवहारांसाठी प्रत्येक पाकिटासाठी एक विशिष्ठ अद्वितीय क्रमांक असतो जो तुम्हाला संबंधित सेवा पुरवठादाराकडून मिळतो (उदाहरणार्थ  - 1JSVixNRgqyc3prJpjqk8cB14KQW7VikYs). बीटकॉईन तुमच्या पाकिटात स्वीकारण्यासाठी बीटकॉईन पाठवणार्याकडे हा क्रमांक असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तुमच्या पाकिटातून बीटकॉईन पाठवताना स्वीकाणार्याच्या बीटकॉईन पाकिटाचा क्रमांक तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. साधारण चलनाला पर्याय म्हणून बीटकॉईनचा फायदा होत असला तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चलनांचे काही प्रमाणात नुकसान होत असते.

बीटकॉईन कमावण्याच्या कायदेशीर पद्धती

१) (Mining)  माइनिंग – सध्यातरी संपुर्ण २१ दशलक्ष बीटकॉईन अस्तित्वात आलेले नाहीत त्यामुळे खाणकाम करून बीटकॉईन कमावू शकता. खाणकाम करण्यासाठी अधिक माहिती माइनिंग संदर्भातील वरील माहितीपटात मिळेल.

२) दान – तुम्ही एखादे समाजोपयोगी काम करत असाल तर तुम्ही तुमचा बीटकॉईन पाकीट क्रमांक कामाबरोबर देऊ शकता आणी दान करण्याबद्दल सुचवू शकता.

३) सेवा – तुम्ही इंटरनेटवर एखादी सेवा पुरवत असाल तर त्याबदल्यात बीटकॉईन स्वीकारण्याचा पर्याय अपरिहार्यता असल्यास उपयोगी पडू शकतो, पण राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून प्रमाणाबाहेर वारंवार बीटकॉईन वापरणे शक्यतो टाळा.

४) जाहिराती – काही संकेतस्थळे जाहिराती पाहण्यासाठी बीटकॉईन देतात, त्यांचा वापर करूनही तुम्ही बीटकॉईन कमावू शकता. जाहिराती पाहिल्यावर बीट कॉईन देणारी संकेतस्थळे. तुम्ही ही बुकमार्क करून ठेऊ शकता.

बीट व्हिजिटर - www.tinyurl.com/BitVisitor-Portal
बीट क्रेट - www.tinyurl.com/Bitcrate-Portal

५) सावकारी – तुम्ही तुमचे बीटकॉईन कर्ज रूपी इतरांना देऊ शकता, विश्वासू व्यक्तीबरोबर थेट व्यवहार करू शकता किंवा खालील संकेतस्थळावर कर्ज देऊ शकता त्याचबरोबर संकेतस्थळावर  कर्ज घेण्याचीही सोय आहे.

बीटबॉंड - www.tinyurl.com/Bitbond-Portal
याशिवाय इतरही मार्गाने तुम्ही बीट कॉईन कमावू शकता पण ते मार्ग कायदेशीर असतील याची दक्षता घ्या, बीटकॉईन कमावण्याचे ऑनलाइन लॉटरीसारखे पर्याय इंटरनेटवर उपलब्ध असले तरी भारतात अशा गोष्टींना बंदी आहे, दोषींना आर्थिक दंड किंवा कारावास किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. पुढच्या भागात आपण बीटकॉईनबद्दल प्रश्नोत्तरे पाहुयात ज्यामुळे बीटकॉईनबद्दल असणारे समज अधिक दृढ होतील आणी गैरसमज दूर होतील.

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू
Bitcoin आणी काही तांत्रिक पैलू
जागतिक बाजारातील किंमत काय, त्यात बदल कसे होतात, इंटरनेट/संगणक वापरून बीटकॉईन कसे कमावता येतात, बीटकॉईन तुमच्या खात्यामध्ये कसे स्वीकारावेत, कसे खर्च करावेत याचे त्याचप्रमाणे याचे इतरही पैलूंबद्दल या लेखात माहिती मिळेल.
https://2.bp.blogspot.com/-JNV_ugwG9Ls/UwDXmxhNUXI/AAAAAAAABhg/a6ymagLA1FU/s1600/Bitcoin.jpg
https://2.bp.blogspot.com/-JNV_ugwG9Ls/UwDXmxhNUXI/AAAAAAAABhg/a6ymagLA1FU/s72-c/Bitcoin.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2014/02/bitcoin-aspects.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2014/02/bitcoin-aspects.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte