Archive Pages Design$type=blogging


Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?

तुम्ही Android फोन वापरता का? Android वापरताना त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी साठवतो/सेव्ह करतो. तुम्हाला त्यातील नेहेमी नको असलेल्या गोष्टी कशा लपवता येतात हे आज आपण पाहुयात.

तुम्ही Android फोन वापरता का? Android वापरताना त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी  साठवतो/सेव्ह करतो. तुम्हाला त्यातील नेहेमी नको असलेल्या गोष्टी कशा लपवता येतात हे आज आपण पाहुयात. तुम्ही एखाद्या सूचनेचा किंवा वेळापत्रकाचा किंवा इतर कोणताही फोटो काढलात पण तो तुम्हाला Android च्या मुख्य/इतर गॅलेरीत दिसायला नको असेल तर तुम्ही तो गॅलेरीतून लपवू शकता, अर्थात सध्यातरी तशी थेट सुविधा देण्यात आलेली नसली तरी आडमार्गाचा वापर करून तुम्ही ते करू शकता. तुम्ही अशाच प्रकारे नेहेमी नको असलेल्या ध्वनिफिती/गाणी किंवा ई-पुस्तके लपवू शकता.

Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?


गाणी/फोटो/ध्वनिफिती/व्हिडियो लपवण्याचे फायदे

  • एखादी ध्वनिफीत ही एखाद्या भाषणाची/इतर प्रकारची असू शकते, त्यामुळे ती लपवली तर एम.पी ३ प्लेयर मध्ये गाणी ऐकताना मध्येच ती अनावश्यक ध्वनिफित सुरु होऊन रसभंग होणार नाही.
  • एखादी सूचना/वेळापत्रक याचा फोटो लपवल्यावर गॅलेरीमध्ये तो दिसणार नाही त्यामुळे इतर फोटो सलग पाहत असताना/ स्लाईड शो सुरु असताना मध्येच असे फोटो दिसणार नाहीत.
  • एखादे गाणे तुम्हाला एम.पी ३ प्लेयर मध्ये दिसायला नको असल्यास तुम्ही ते लपवू शकता ज्यामुळे हवी असलेली इतर गाणी तुम्ही एम.पी ३ प्लेयर मध्ये ऐकू शकाल, शिवाय लपवलेले गाणे गरजेनुसार वापरू शकाल.

तुम्ही लपवलेल्या गाणी/फोटो/ध्वनिफिती ह्या मुख्य गॅलेरी किंवा एम.पी ३ प्लेयर मधून अदृश्य होतातच शिवाय इतर सर्व तत्सम एप्लीकेशन मधून अदृश्य होतात. तुम्ही लपवलेले साहित्य हे अदृश्य झाले असले तरीही तुम्ही ते कोणत्याही फाईल एक्सप्लोररच्या मदतीने जर प्रस्थापित केला असेल तर पाहू शकता.

गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?
आपण हे सर्व नोमिडिया फाईलच्या मदतीने लपवू शकतो. ज्या फोल्डर मध्ये नोमिडिया फाईल ठेवलेली असते त्या फोल्डरला सर्व गॅलेरी किंवा एम.पी ३ प्लेयर एप्लीकेशन्स कडून वगळण्यात येते.


  • सर्वप्रथम ES File Explorer सुरु करा (बहुतांश फोनमध्ये हे एप्लीकेशन आधीपासूनच प्रस्थापित केलेले असते) तुमच्या फोनमध्ये हे उपलब्ध नसल्यास ते या दुव्यावरून प्रस्थापित/Install करा. हे एक फायदेशीर एप आहे, याचे अनेक उपयोग आपण पुढे बघणार आहोत.
  • एप्लीकेशन सुरु केल्यानंतर फोनमध्ये किवा मेमरी कार्डमध्ये तुम्हाला हव्या त्या नावाने नवीन फोल्डर तयार करा आणी त्यात .nomedia नवीन फाईल तयार करा (nomedia च्या आधीचा टिंब विसरू नका)
  • आता तुम्हाला लपवायच्या असलेल्या फाईल पर्यंत या, आणी त्या फाईल/फाईल्सना तुम्ही आधी तयार केलेल्या फोल्डरमध्ये हलवा.
  • फोन बंद करून पुन्हा सुरु करा.
  • तुमची ती फाईल आता अदृश्य झाली असेल. तुम्हाला ती फाईल ES File Explorer मधून देखील लपवायची असेल तर त्या फाईलवर बोट/स्टायलस धरून ठेवा आणी ती निवडली गेल्यावर More हा पर्याय निवडून Hide ची निवड करा. तुमची फाईल ES File Explorer मधून अदृश्य होईल. (जर फाईल अजूनही दिसत असेल तर खाली दिलेला "महत्वाचा टप्पा" वाचा.)


पुन्हा फाईल/फाईल्स दिसण्यासाठी


  •  एकदा लपवलेली फाईल/फाईल्स पुन्हा दिसण्यासाठी फक्त नोमिडिया फाईल नष्ट/डिलीट करा.
  •  ES File Explorer मध्ये लपवलेली फाईल/फाईल्स पुन्हा दिसण्यासाठी एप्लीकेशन सुरु केल्यानंतर पर्यायांमधून Hide List निवडा आणी दिसायला हव्या असणाऱ्या फाईल्सच्या पुढे दिसणारा Restore हा पर्याय निवडा.



फोन मधील सर्व फाईल्स संकेताक्षराने/पासवर्डने लपवण्यासाठी Password Settings हा पर्याय निवडून Start Protect निवडा आणी हवे असलेले संकेताक्षर लिहा, याशिवाय Sdcard मध्ये वर सांगितल्याप्रमाणे .nomedia फाईल तयार करा. पुढे दर वेळी एप्लीकेशन सुरु केल्यानंतर तुम्हाला संकेताक्षर द्यावे लागेल.

संपुर्ण फोल्डर लपवण्यासाठी

  •  एक एक फाईल लपवण्यापेक्षा तुम्ही संपुर्ण फोल्डर देखील लपवू शकता. जे फोल्डर लपवायचे आहे त्या फोल्डर मध्ये .nomedia फाईल तयार करा.


उदाsdcard/ ext_sdcard/ DCIM/ Camera मध्ये .nomedia फाईल तयार केल्यावर गॅलेरीमध्ये कॅमेर्यामधून काढलेले फोटो दिसणार नाहीत.

महत्वाचा टप्पा


  • आता वरील सर्व गोष्टी केल्यानंतर महत्वाचे म्हणजे सिस्टिम (आपला फोन) रिफ्रेश करणे. यासाठी फोनचा सेटींग्स पर्याय निवडा आणी त्यात एप्स (Apps) हा उपपर्याय निवडा. 
  • जर तुम्ही व्यवस्थितपणे इथपर्यंतच पोहोचला असाल तर तुम्हाला DOWNLOADED - ON SD CARD - RUNNING - ALL असे चार पर्याय दिसतील (फोनची स्क्रीन लहान असेल तर तीनच पर्याय दिसतील, त्यावेळी RUNNING हा पर्याय तुमच्या डाव्या बाजूला सरकवा)
  • आता तुम्ही प्रस्थापित केलेले एप्स तुम्हाला दिसतील, त्यात Gallery निवडून अनुक्रमे Clear Cache - Clear Data - Force Stop निवडा (याने डाटा पुसला जाणार नाही, निश्चिंत रहा)
  • आता हीच प्रक्रिया Media Storage आणी  Music हे एप्स निवडून पुन्हा करा, ह्यानंतर फोन बंद करून पुन्हा सुरु करा.

तुमच्या Android फोनमध्ये हे प्रयोग जरूर करून पहा आणी काही अडल्यास इथे बिनधास्त विचारा..

COMMENTS

Say Something
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?
Android फोनमध्ये गाणी/फोटो/व्हिडियो कसे लपवाल?
तुम्ही Android फोन वापरता का? Android वापरताना त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी साठवतो/सेव्ह करतो. तुम्हाला त्यातील नेहेमी नको असलेल्या गोष्टी कशा लपवता येतात हे आज आपण पाहुयात.
http://2.bp.blogspot.com/-ysSvJu7Smto/UyRmkXednaI/AAAAAAAABlI/9ACIcjt3fA8/s1600/Hide+in+Android.jpg
http://2.bp.blogspot.com/-ysSvJu7Smto/UyRmkXednaI/AAAAAAAABlI/9ACIcjt3fA8/s72-c/Hide+in+Android.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2014/03/hide-files-in-android.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2014/03/hide-files-in-android.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte