Archive Pages Design$type=blogging


फ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय

इंटरनेटवरील काही गोष्टींचे भय न बाळगता त्यांचा चातुर्याने वापर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. फ्रि-चार्ज हे संकेतस्थळ कॅशबॅकसारख्या महत्वाच्या ऑफर्ससह किमान २ खात्यांद्वारे वापरले तर एका सर्वसाधारण कुटुंबाचा फोन, टिव्ही, इंटरनेटसेवा (डेटा कार्ड) इत्यादींवर होणारा खर्च ६०% ते ७०% पर्यंत सहज कमी होऊ शकतो याशिवाय खर्च होणाऱ्या रकमेपर्यंत कुपन्स देखील मिळू शकतात.

भारतात सर्वाधिक जण प्रीपेड सुविधा असलेले फोन वापरतात. टिव्ही साठी डिश सेवा पुरवणाऱ्या डी.टी.एच सेवा देखील प्रीपेड सुविधा देतात. बहुतेक इंटरनेट सेवा पुरवठादार (डेटा कार्ड) देखील प्रीपेड सेवा देतात. वाजवीपेक्षा अधिक बिल आकारणा टाळण्यासाठी आणी आगाऊ रकमेचा भरणा करून मग सेवा
उपभोगण्यासाठी प्रीपेड सुविधा सुरु झाली. आपण ह्या सर्व प्रीपेड सेवांचा लाभ घेण्यासाठी आगाऊ भरणा (रिचार्ज) करतो, सर्वसाधारणपणे दुकानदार किंवा सेवा पुरवठादाराकडे आपल्याला हा आगाऊ भरणा करता येतो पण याही पुढे आपण इंटरनेट वापरून देखील अशा प्रकारे  प्रीपेड सेवांसाठी आवश्यक रकमेचा आगाऊ भरणा करू शकतो. सेवा पुरवठादाराच्या संकेतस्थळावर टी सोय असली तरीही इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळे ही सुविधा पुरवतात.

फ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय

               काही काळापूर्वी Oxicash.in हे संकेतस्थळ अतिशय लोकप्रिय होते, पण आज ई-मार्केट मध्ये अनेक प्रतिस्पर्धी उतरल्यामुळे ऑक्सिकॅशची लोकप्रियता कमी झाली असावी. आज Oxicash, PayTM सारख्या संकेतस्थळांवरून रकमेचा आगावू भरणा करणे, पोस्टपेड बिल्सचा भरणा करणे शक्य असले तरी यांसारख्याच पण विशेष अशा संकेतस्थळाची माहिती घेणार आहोत. आज आपण www.freecharge.in या संकेतस्थळाविषयी माहिती घेणार आहोत. आपण फ्रि-चार्ज संकेतस्थळावर वर सांगितल्याप्रमाणे प्रीपेड सुविधा रक्कम भरणा, डेटा कार्ड सेवा, डी.टी.एच सेवा, पोस्टपेड बिल्सचा भरणा करू शकतो. या संकेतस्थळाचे नाव जरी फ्रि-चार्ज असले तरीही आपल्याला रकमेचा भरणा करावाच लागतो हे लक्षात असुद्या. फ्रि-चार्ज इतर संकेतस्थळांप्रमाणेच परंतु तरीही त्यांच्यापेक्षा वेगळे संकेतस्थळ कसे आहे हे पाहुयात..



फ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय               फ्रि-चार्ज या संकेतस्थळाद्वारे समजा तुम्ही तुमचा फोन रुपये १००/- इतक्या रकमेने रिचार्ज केलात तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये १०० रुपये आगाऊ भरणा केल्याप्रमाणे मिळतात (अर्थात नेहेमीप्रमाणेच काही रक्कम वजा होते जितकी इतर वेळी दुकानदाराकडे १०० रुपये आगाऊ भरणा केल्यावर होते तितकी) याशिवाय तुम्ही रुपये १००/- इतक्या किमतीचे खात्रीशीरपणे कुपन्स मिळवू शकता (जवळपास १० ते ७०/८० दुकानांचे उदाहरणार्थ : मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, के.एफ.सी किंवा Jabong.com, Myntra.com इत्यादींसाठी वापरू शकता) याशिवाय जर कॅशबॅक ऑफर उपलब्ध असल्यास रुपये ५०/- पर्यंत रक्कम खात्रीशीरपणे पुन्हा मिळवू शकता. (कॅशबॅक ऑफर दर महिन्यातील वेगवेगळ्या ३ ते ६ दिवसांसाठी उपलब्ध असते) म्हणजे रकमेच्या वापरानंतरदेखील तुम्ही फायदा उचलू शकता.

साध्या उदाहरणाद्वारे समजून घेऊयात ..

समजा तुम्ही आयडीया (Idea) ची प्रीपेड सेवा असलेला फोन वापरात आहात .. आणी रुपये १५०/- चा आगाऊ भरणा तुम्ही फ्रि-चार्ज द्वारे करत आहात.

१) रुपये. १५०/- चा आगाऊ भरणा केल्यावर तुम्हाला संपूर्णपणे रुपये. १५०/-  ही रक्कम फोनमध्ये उपलब्ध होते (कारण आयडीयाची Full Talktime ऑफर सध्या रुपये. १५०/- ह्या रकमेवर देखील उपलब्ध आहे) कोणत्याही सेवेबद्दल सुरु असलेल्या ऑफर्स बाबत माहिती इथे त्वरित मिळू शकते.

२) रुपये. १५०/- संपूर्णपणे फोनमध्ये उपलब्ध झाल्यावर देखील तुम्ही अधिक कोणतीही रक्कम न भरता उपलब्ध असलेल्यांपैकी रुपये. १५०/- किमतीचे तुम्हाला हव्या असलेल्या दुकानांचे एक किंवा अधिक कुपन्स (या उदाहरणात अधिकतम रुपये. १५०/- पर्यंतची एक किंवा अधिक कुपन्स) खात्रीशीरपणे मिळवू शकता आणी त्या कुपन्सचा वापर करून त्या त्या दुकानात/संकेतस्थळावर ठराविक सवलती मिळवू शकता. सवलतींची आणी अटींची माहिती तुम्हाला फ्रि-चार्ज या संकेतस्थळावर कुपन्स घेण्याआधी आणी ई-मेलवर कुपन्स घेतल्यानंतर मिळवू शकता.

३) पहिल्या पायरीत रुपये. १५०/- चा आगाऊ भरणा करताना जर कॅशबॅक ऑफर उपलब्ध असेल तर भरणा पूर्ण झाल्यानंतर २४ तासांच्या आत फ्रि-चार्ज क्रेडीटच्या स्वरुपात संबंधित रक्कम मिळवू शकता. उदाहरणार्थ – दर महिन्यातून एक किंवा दोन वेळा ५०% (किंवा अधिकतम रुपये. ५०/- यापैकी कमी) म्हणजे या उदाहरणात ५० रुपये फ्रि-चार्ज क्रेडीटच्या स्वरुपात मिळवू शकता, जे तुम्ही नंतर कधीही इतर भरणा करताना वापरू शकता.


.

रुपये. १५०/- आगाऊ भरणा = रुपये. १५०/- फोनमध्ये Talktime
* याशिवाय *
रुपये. १५०/- ची कुपन्स अगदी विनामुल्य (खात्रीशीर)
रुपये. ५०/- फ्रि-चार्ज क्रेडीटच्या स्वरुपात (उपलब्ध असल्यास)



  • ५०% किंवा अधिकतम रुपये. ५०/- यापैकी कमी ही ऑफर महिन्यातून किमान १ ते २ वेळा उपलब्ध असते.
  • २०% किंवा अधिकतम रुपये. २०/- यापैकी कमी ही ऑफर महिन्यातून किमान ३ ते ४ वेळा उपलब्ध असते.
  • याशिवाही इतर कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध असतात.


               सदर कॅशबॅक ऑफर बद्दल फ्री-चार्जच्या फेसबुक पानावर वेळोवेळी माहिती देण्यात येते आणी त्याबरोबरच एक प्रोमो कोड देण्यात येतो जो वापरल्यावरच कॅशबॅक ऑफर मिळू शकते म्हणजेच फ्रि-चार्ज क्रेडीट कॅशबॅकच्या स्वरुपात मिळवण्यासाठी प्रोमो कोड वापरणे अनिवार्य आहे.

               फ्री-चार्जवर खाते उघडल्यानंतर दर वेळी तुम्ही नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड द्वारे रकमेचा भरणा करू शकता. याशिवाय फ्रि-चार्ज क्रेडीट विकत देखील घेऊ शकता, ज्यातून पुढे दर वेळी रकमेचा भरणा करता येतो. फ्रि-चार्ज क्रेडीट विकत घेतले असल्यास किंवा नसल्यास देखील कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येतो, म्हणजे आधी ठराविक फ्रि-चार्ज क्रेडीट (म्हणजेच रुपये) उपलब्ध असल्यास (किंवा नसल्यास) त्यात कॅशबॅक ऑफरचे क्रेडीट (म्हणजेच रुपये) जोडले जातात आणी ते वापरून तुम्ही पुढील वेळी रिचार्ज करू शकता.
               फ्रि-चार्ज क्रेडीटचा आणखीन एक फायदा म्हणजे जर काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा भरणा अयशस्वी झाला तर लगेच सदर रक्कम कोणतीही वजावट न होता फ्रि-चार्ज क्रेडीटमध्ये जमा होते म्हणजे तुम्ही लगेचच ते फ्रि-चार्ज क्रेडीट वापरून भरणा करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू शकता.

कॅशबॅक ऑफर बद्दल काही महत्वाचे :

  • दर वेळी नियम आणी अटी फ्रि-चार्जच्या या फेसबुक पानावर दिल्या जातात.
  • काही ऑफर्स ह्या फक्त Android एप्लिकेशन वर लागू पडतात तर काही फक्त मुख्य आणी मोबाईल संकेतस्थळावर. याविषयी स्पष्ट माहिती फेसबुक पानावर दिली जाते.
  • फ्रि-चार्ज क्रेडीट कॅशबॅकच्या स्वरुपात मिळवण्यासाठी प्रोमो कोड वापरणे अनिवार्य आहे. जो फेसबुक पानावर दिला जातो.

प्रोमो कोड मिळण्याची काही आणखी ठिकाणं :


ऑफर मिळवण्यासाठी या किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून मिळालेला प्रोमो कोड वैध आहे की नाही हे रिचार्ज करताना प्रोमो कोडच्या रकान्यात प्रोमो कोड लिहून Apply बटन दाबले असता लगेच लक्षात येते. प्रोमो कोड वैध असल्यास त्याबाबत माहिती दिसते, चुकीचा कोड वापरला तर तसा संदेश दिसतो. . 

               फ्री-चार्ज द्वारे नुकत्याच घेण्यात आलेल्या सोडतीत दोन भाग्यवान ग्राहकांना आयफोन ५ एस देण्यात आला.अशाच प्रकारच्या ऑफर्समुळे आणी गिऱ्हाइकांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे फ्रि-चार्ज हे संकेतस्थळ  इतरांपेक्षा सरस आणी उपयुक्त ठरते.
               इंटरनेटवरील काही गोष्टींचे भय न बाळगता त्यांचा चातुर्याने वापर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. फ्रि-चार्ज हे संकेतस्थळ कॅशबॅकसारख्या महत्वाच्या ऑफर्ससह किमान २ खात्यांद्वारे वापरले तर एका सर्वसाधारण कुटुंबाचा फोन, टिव्ही, इंटरनेटसेवा (डेटा कार्ड) इत्यादींवर होणारा खर्च ६०% ते ७०% पर्यंत सहज कमी होऊ शकतो याशिवाय खर्च होणाऱ्या रकमेपर्यंत कुपन्स देखील मिळू शकतात.

COMMENTS

Say Something
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: फ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय
फ्रि-चार्ज : रिचार्जसाठी एक उत्तम पर्याय
इंटरनेटवरील काही गोष्टींचे भय न बाळगता त्यांचा चातुर्याने वापर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. फ्रि-चार्ज हे संकेतस्थळ कॅशबॅकसारख्या महत्वाच्या ऑफर्ससह किमान २ खात्यांद्वारे वापरले तर एका सर्वसाधारण कुटुंबाचा फोन, टिव्ही, इंटरनेटसेवा (डेटा कार्ड) इत्यादींवर होणारा खर्च ६०% ते ७०% पर्यंत सहज कमी होऊ शकतो याशिवाय खर्च होणाऱ्या रकमेपर्यंत कुपन्स देखील मिळू शकतात.
http://2.bp.blogspot.com/-egiCOcM868g/U2t-h6132DI/AAAAAAAABsM/AR-pnL3Qx70/s1600/freecharge.png
http://2.bp.blogspot.com/-egiCOcM868g/U2t-h6132DI/AAAAAAAABsM/AR-pnL3Qx70/s72-c/freecharge.png
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2014/05/freecharge.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2014/05/freecharge.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte