Archive Pages Design$type=blogging


विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग १

आज आपण विना गुंतवणूक (अगदी चकटफू) ऑनलाईन कमाई कशी करता येईल हे पाहणार आहोत. ज्याअर्थी लेखाचा मथळा “विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग” हा आहे त्याअर्थी संगणक आणी त्यावर इंटरनेट आवश्यक आहे.

अमुक-अमुक रक्कम भरा आणी घरात बसून पैसे कमवा किंवा Work from Home अशा आशयाच्या जाहिराती तुम्ही नक्कीच कुठेना-कुठे वाचल्या असतील कदाचित संपर्कही केला असेल पण जाहिरातीत ज्याप्रमाणे विना गुंतवणूक हा शब्द ठळकपणे लिहिलेला जातो तितक्याच अलगदपणे नाममात्र,निव्वळ गुंतवणूक असे शब्द प्रत्यक्ष संवादात जोडले जातात. असो,  आज आपण विना गुंतवणूक (अगदी चकटफू) ऑनलाईन कमाई कशी करता येईल हे पाहणार आहोत. ज्याअर्थी लेखाचा मथळा “विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग” हा आहे त्याअर्थी संगणक आणी त्यावर चांगले (वेगवान नसले तरी अगदीच वाईट नको) इंटरनेट आवश्यक आहे आणी मेहनत घेण्याची तयारी देखील.

    इथे ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणले आहे म्हणजे सर्वांनाच तो सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. पुढे वाचण्याआधी थोडा अंदाज बांधा कि हा मार्ग कोणता असू शकतो? कोणी म्हणेल मार्केटिंग किंवा ब्लॉग, वेबसाईट असा असावा किंवा काहींचे तर्क लिंक शेयरींग, बीटकॉईन खाणकाम पर्यंत देखील गेले असतील. आज आपण जो मार्ग बघणार आहोत तो यापेक्षा वेगळा आहे. आता उत्सुकता अधिक न ताणता सांगतो, हा मार्ग आहे तुम्ही म्हणाल तो..!! हो, तुम्हाला जो हवाय तो.. चक्रावलात ना..?

विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग १

    आपण अशा वेबसाईट बद्दल माहिती घेणार आहोत ज्यावर तुम्ही कोणतेही काम करून पैसे कमावू शकता. काही उदाहरणे द्यायची झाली तर शिवणकाम, भरतकाम, छायाचित्रण, गायन, सुत्रसंचालन, सुलेखन, सल्लामसलती, अभिनय, हस्तकला निर्मिती, वाचन, चित्रकला आणी यासारखी असंख्य कामे..

    आपल्या माननीय पंतप्रधानांनी एका भाषणात ज्या स्किल्स, टॅलेंट डेव्हलपमेंट / एक्सपोर्ट, चा उल्लेख केला त्याचाच हा एक प्रकार आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आज संपूर्ण जगाला कुशल मनुष्यबळाची गरज आहे आणी हीच कुशलता भारतात बसूनच आपण पुरवू शकलो तर? तेही विना गुंतवणूक.. यामुळे आपल्याला काम आणी त्याचे मूल्य, देशाला बहुमोल परकीय चलन शिवाय जगभरातील लोकांना कुशल व्यक्ती मिळेल जेणेकरून त्यांचे काम उत्तमरीत्या पार पडेल असा तिहेरी फायदा यातून मिळू शकतो.

    फिवर (fiverr) ह्या संकेतस्थळ आपल्याला आपल्या कलेसाठी, कौशल्यासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देते. वर लिहिलेल्या किंवा इतर कोणत्याही कामासाठी आपल्याला सुमारे ५ अमेरिकन डॉलर्स मिळतात (ज्यातून १ डॉलर प्रत्येक ऑर्डरमागे कापून घेतला जातो) त्यामुळे सरतेशेवटी कोणत्याही कामाचे दर नगामागे कमीत कमी ४ अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास २४० रुपये नक्की मिळतात शिवाय जर तुम्ही कोणतीही वस्तू बनवून परदेशी निर्यात करणार असाल तर त्याचा खर्च हा वेगळा मिळतो जो तुम्ही ठरवाल तो दर. उदाहरणार्थ

    जर तुम्ही कोणतीही वस्तू तयार केलीत तर त्या वस्तुचे किमान आणी कमाल ४ डॉलर्स (म्हणजे जवळपास २४० रुपये) मिळतात (पहिला दर्जा मिळवल्यानंतर ह्या रकमेत तुम्ही इतर किमती जोडू शकता पण मुळ किंमत हीच राहते)

    एखादी व्यक्ती ज्या कामात पारंगत आहे तेच काम जर जगासमोर मांडले तर निश्चितच त्या व्यक्तीला त्याकामासाठी निवडले जाऊ शकते. या संकेतस्थळावर १०,००० हून अधिक लोक कुशल व्यक्तींच्या शोधात येतात. वापरण्यास सोपे आणी सुरक्षित असल्यामुळे हे संकेतस्थळ जगभर लोकप्रिय  झाले आहे.

* पहिला दर्जा म्हणजे *



३० दिवस संकेतस्थळावरील हजेरी + १० विक्री संख्या (तुमच्या वस्तू १० किंवा त्याहूनजास्त वेळा विकल्या गेल्या पाहिजेत, यासाठी वेळेचे बंधन नाही) + गिऱ्हाइकांकडून Excellent दर्जा



    विविध दर्जानुसार विक्रेत्याची विभागणी केली जाते. विक्रेत्यांच्या दर्जाबद्दल अधिक माहिती इथे मिळेल.

सुरुवातीला ह्या गोष्टी फार महत्वाच्या नाहीत. आपण थेट मुद्याकडे वळूयात.

खाते कसे उघडाल?
सर्वप्रथम ह्या दुव्यावर टिचकी द्या आणी दिसत असलेल्या पानावर तुमचा ई-मेल पत्ता लिहा. आणी Create बटणावर टिचकी द्या.
आता तुम्हाला तीन रकाने दिसतील..

  • Choose a Username – तुमचे नाव किंवा टोपणनाव इथे लिहा.
  • Choose a Password – एखादे नवीन लक्षात राहील असे संकेताक्षर लिहा.
  • गणित – इथे दिसत असलेले गणित सोडवा, म्हणजे तुम्ही माणूस आहात याची खात्री त्यांना द्या. बेरीज किंवा वजाबाकी इतकेच आहे.


    आता पुन्हा Create बटणावर टिचकी द्या. जर दिलेली माहिती बरोबर असेल तर तुम्हाला दिलेल्या ई-मेल पत्यावर खात्री करण्यासाठी ई-मेल येईल त्याद्वारे ई-मेल पत्ता बरोबर असल्याची पुष्टी करा, याबाबत ई-मेल मध्ये माहिती दिली असेल.

    ई-मेल पत्याची पुष्टी केल्यावर तुमच्या फिवर खात्यावर लॉग इन व्हा आणी सर्वप्रथम तुमच्याबद्दल ग्राहकांच्या दृष्टीकोनातून संक्षिप्त माहिती द्या आणी एखादा फोटो जोडा (तुमचीच माहिती आणी फोटो असला पाहिजे अशी अट नाही, फक्त काम चोख हवे) शिवाय Security प्रश्न आणी उत्तर देखील निवडून ठेवा. TO DO या पर्यायावर तुम्ही काय करायला हवे याबद्दल माहिती मिळेल. आता तुमचे खाते तयार झाले आहे, तुम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तूंची किंवा सेवांची विक्री सुरु करू शकता. याबाबत पुढील भागात माहिती घेऊयात.

 

COMMENTS

BLOGGER: 1
Loading...
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग १
विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग १
आज आपण विना गुंतवणूक (अगदी चकटफू) ऑनलाईन कमाई कशी करता येईल हे पाहणार आहोत. ज्याअर्थी लेखाचा मथळा “विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग” हा आहे त्याअर्थी संगणक आणी त्यावर इंटरनेट आवश्यक आहे.
http://2.bp.blogspot.com/-eSaZi3XR8WU/U5tP3BHsQ9I/AAAAAAAAB0c/THg0jNvX-lk/s1600/fiverr.jpg
http://2.bp.blogspot.com/-eSaZi3XR8WU/U5tP3BHsQ9I/AAAAAAAAB0c/THg0jNvX-lk/s72-c/fiverr.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2014/06/earn-money-without-investment.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2014/06/earn-money-without-investment.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte