Archive Pages Design$type=blogging


विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग २

आज आपण विना गुंतवणूक (अगदी चकटफू) ऑनलाईन कमाई कशी करता येईल हे पाहणार आहोत. ज्याअर्थी लेखाचा मथळा “विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग” हा आहे त्याअर्थी संगणक आणी त्यावर इंटरनेट आवश्यक आहे.

नमस्कार, फिवर या संकेतस्थळाचा वापर करून पैसे कसे कमावता येतात ह्याबद्दलच्या लेखमालिकेत आपण गेल्या लेखात आपण फिवर या संकेतस्थळाची माहिती घेतली आणि त्यावर खाते कसे तयार करावे तेही बघितले. तुम्ही जर हा लेख म्हणजेच भाग १ वाचला नसेल तर आधी तो वाचा असे मी सुचवीन, यामुळे तुम्हाला या संकेतस्थळाची ओळख व्हायला मदत होईल.




आपण या लेखमालिकेतील ह्या दुसऱ्या लेखात फिवरवर आपण कोणते काम करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या कामात पारंगत असतेच असे माझे मत आहे आणी फिवर हे व्यासपीठ त्या व्यक्तींना उत्पन्न आणी इतरांना कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी तयार केले आहे. अगदी म्हणजे सतत झोपून राहणारा व्यक्ती देखील इथे “कोणत्याही परिस्थितीत त्रास न करून घेता सुखाने झोप काढण्याचे १० उपाय” सांगून पैसे मिळवू शकते, जगात निद्रनाशाचा त्रास अनेकांना भेडसावतो त्यापैकी काही व्यक्ती नक्कीच या झोपाळू व्यक्तीची मदत घेऊ शकतील. असो, हास्यास्पद वाटत असले तरीही हे खरे आहे. तुम्ही देखील कोणत्या न कोणत्या कामात पारंगत असाल तर थेट ते काम इथे मांडा, त्यासाठी तुम्हाला जगभरातून कोणीही ऑर्डर देऊ शकेल त्यांचे काम पूर्ण करून द्या आणी पैसे थेट बँकेत किंवा पेपल द्वारे बँकेत मिळवा (कारण भारतीयांना रिझर्व बँक पैसे पेपल मध्ये ठेऊ देत नाही, काळ्या पैश्यांच्या बंदोबस्तासाठी बहुदा).


विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग २



तुम्ही कोणते काम करू शकता हे फिवर वर कसे सांगाल?
फिवर वर कोणत्याही कामाला गिग (Gig) असे म्हणतात, एक गिग तुम्ही मांडल्यानंतर तर ती एक/अनेक ग्राहकांकडून कितीही वेळा विकत घेतली जाऊ शकते. तुम्ही जर वेबसाईट डिझायनर/डेव्हलपर असाल तर फक्त, “इथे वेबसाईट डिझाईन करून दिली जाईल” अशी पुणेरी पाटी न लावता एका गिग एवजी ५ किंवा त्यापेक्षा जास्त गिग्स मांडल्यात तर त्याचा अधिक फायदा होतो. उदाहरणार्थ

  • मी ५ डॉलर्स घेऊन आकर्षक वेबसाईट बनवू शकतो.
  • मी ५ डॉलर्स घेऊन आकर्षक ब्लॉग बनवू शकतो.
  • मी ५ डॉलर्स घेऊन तुमची आधीची वेबसाईट अधिक आकर्षक बनवू शकतो.
  • मी ५ डॉलर्स घेऊन तुमच्या आधीच्या वेबसाईट मधील कोणतीही समस्या सोडवू शकतो.
  • मी ५ डॉलर्स घेऊन तुमची वेबसाईट १० सर्च इंजिन्स मध्ये जोडू शकतो.
  • मी ५ डॉलर्स घेऊन तुमची वेबसाईट १० सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये जोडू शकतो.
आणी अशाच पद्धतीने कितीही प्रकारे तुम्ही गिग मांडू शकता.

हे झाले वेबसाईट डेव्हलपरबाबत अशाच प्रकारे चित्रकार, छायाचित्रकार, गायक, संगणक तज्ञ, लेखक, कवी, निवेदक, सल्लागार, तज्ञ, सुलेखनकार म्हणजेच थोडक्यात १४ विद्या आणी ६४ कला आणी त्या पलीकडेही  कौशल्य बाळगणाऱ्यांना इथे वाव आहे, अट फक्त एकच काम देखील वाव (Wow!) असले पाहिजे.
वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गिग मांडण्याचे मुख्य कारण इथे येणारे ग्राहक हे नेमके काम करून देणाऱ्याच्या शोधात असतात त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले काम हे कोणत्याही प्रकारचे असू शकते तेव्हा तुम्ही ते काम करण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहात हे पटवून देण्याचे काम गिग करते.

हा झाला ओळखीचा भाग आता तांत्रिक बाबींकडे वळूयात.

तुम्ही कोणते काम करू शकता हे फिवर वर कसे मांडाल?

सर्वप्रथम तुमच्या फिवर खात्यावर लॉग इन व्हा.
आता सर्वात वर पर्याय असलेली एक काळी पट्टी दिसेल (फेसबुकची जशी निळी दिसते तशी)
त्यातील सेल्स (Sales) हा पर्याय निवडा.
सेल्स पानावर उजव्या बाजूला Actions या पर्यायाखालील Create Gig हा पर्याय निवडा.
आता गिग मांडण्याचे पान उघडेल इथे खालीलप्रमाणे तुमची माहिती भरा.

GIG TITLE – 

तुम्ही कोणते काम करून देणार आहात याची माहिती भरा.
सुरुवातीला  I will आणी शेवटी  for $5 हे शब्द आपोआप जोडले जातात, तुम्ही फक्त तुमचे काम लिहायचे. उदाहरणार्थ – sing a song for you किंवा write a poetary for your better half on your behalf इत्यादी

CATEGORY – 

इथे कामाचा प्रकार लक्षपूर्वक निवडा (ऑर्डर देणारे बहुतांश लोक प्रकारानुसार गिग शोधतात)

COVER PHOTO – 

फेसबुक सारखाच तुमच्या कामाबद्दलचा फोटो चिकटवा.

GIG GALLERY – 

इथे तुम्ही जे काम करणार आहात त्याचा किंवा तत्सम एखादा फोटो जोडू शकता, एक
चांगला फोटो ऑर्डर्स मिळवू शकतो आणी एक निरुत्साही किंवा निरुपयोगी फोटो मिळणाऱ्या ऑर्डर्स देखील नाकारू शकतो.

DESCRIPTION – 

हा गीगचा अतिशय महत्वाचा टप्पा, तुम्ही कोणते काम करू शकता याबद्दल इथे विस्तृत (जास्तीत जास्त १२०० इंग्रजी अक्षरात) लिहू शकता. एखादे काम करण्यासाठी तुम्हीच सर्वात योग्य व्यक्ती आहात हे पटवून देण्याकरिता हा पर्याय आहे. एखादे काम तुम्ही कशाप्रकारे करणार आहात, इतरांपेक्षा जलद आणी उत्तम काम तुम्ही कसे करणार याबाबत इथे माहिती लिहा. माहिती जितकी आकर्षक तितकेच अधिक ग्राहक आकृष्ट होतील.

TAGS – 

तुमच्या कामाशी संबंधित शब्द जे विभागवारी करण्यासाठी आवश्यक असतात ते इथे लिहा. किमान ३ आणी कमाल ५ शब्द इथे लिहू शकता.

DURATION – 

तुम्ही गिग किती दिवसात पूर्ण करून देऊ शकता याबाबत इथे दिवस निवडा. टाईम ईज मनी आणी म्हणूनच जितके कमी दिवस निवडाल तितकी ऑर्डर मिळण्याची शक्यता जास्त. पण तुम्ही जर ते काम त्या वेळेत पूर्ण करू शकत असाल तरच तेवढा वेळ निवडा अन्यथा ग्राहकांचा विश्वास गमावून बसाल आणी काही वेळेस ऑर्डर देखील. ठराविक वेळेपेक्षाही एक दिवस जास्त निवडणे हे कधीही सोयीचे आहे. कोणत्याही कामासाठी १ ते २९ दिवस वेळ घेऊ शकता.

INSTRUCTIONS  FOR BUYER – 

तुम्ही दिलेली गिग वाचून जर एखादा ग्राहक आकृष्ट झाला आणी त्यांनी ऑर्डर दिली कि त्यांना कामाबद्दल काही सूचना करायच्या असतील, प्रश्न विचारायचे असतील तर ते इथे मांडू शकता. बहुतांश वेळा ग्राहक आधी तुमच्याशी फिवरवरील साध्या मेसेज द्वारे चर्चा करतात आणी त्यांना अपेक्षित असलेल्या कामाबद्दल सांगतात तुम्ही जर त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला तर ते तुमच्याकडे ऑर्डर सोपवतात.


आता हि माहिती भरून झाल्यावर Save and Continue वर टिचकी द्या. नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमच्या कामाबद्दल व्हिडियो जोडू शकता. स्वतःचा व्हिडियो रेकॉर्ड करून त्याद्वारे कामाची माहिती देऊ शकता. किंवा Skip हा पर्याय निवडून पुढे जाऊ शकता.

आता नवीन पानावर तुम्हाला जर कुरियर चार्जेस जोडायचे असतील तर ते जोडू शकतात. हस्तकला, ओरिगामी किंवा इतर वस्तू जर परदेशात पाठवणार असाल तर कुरियरचा खर्च स्वतः करून तो ऑर्डर देणार्याकडून वसूल करू शकता. इथे कुरियरचा जास्तीत जास्त खर्च ८ डॉलर मिळतो. जर अशा प्रकारे खर्च घ्यायचा नसल्यास No Thanks वर टिचकी द्या.

आता नवीन पानावर Publish Gig वर टिचकी दिलीत कि तुमची गिग तुमच्या खात्यावर मांडली जाईल आणी करोडो ग्राहकांपुढे प्रसिद्ध होईल. तुमच्या गिगचा दुवा तुम्ही फेसबुक किंवा इतर ठिकाणीही प्रसिद्ध करू शकता ज्यातून अधिकाधिक ग्राहक आकृष्ट होतील.

ऑर्डर पूर्ण केल्यानंतर पैसे तुमच्या फिवर खात्यात जमा होतील जे तुम्ही पेपल द्वारे बँकेत मिळवू शकता. बँक ट्रान्स्फर हा पर्याय थोडा खर्चिक आहे.

पेपल खाते असेल तर तुमचा पेपल इमेल देऊन ठेऊ शकता किंवा नवीन पेपल खाते काढण्यासाठी हे पहा.


कसा वाटला हा लेख? तुमचे काम जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज व्हा..!! कुठेही अडचण उद्भवली तर इथे हमखास मांडा, मदतीला आम्ही आहोतच..!!

COMMENTS

Say Something
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग २
विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग | भाग २
आज आपण विना गुंतवणूक (अगदी चकटफू) ऑनलाईन कमाई कशी करता येईल हे पाहणार आहोत. ज्याअर्थी लेखाचा मथळा “विना गुंतवणूक ऑनलाईन कमाईचा सर्वोत्कृष्ट मार्ग” हा आहे त्याअर्थी संगणक आणी त्यावर इंटरनेट आवश्यक आहे.
http://2.bp.blogspot.com/-eSaZi3XR8WU/U5tP3BHsQ9I/AAAAAAAAB0c/THg0jNvX-lk/s1600/fiverr.jpg
http://2.bp.blogspot.com/-eSaZi3XR8WU/U5tP3BHsQ9I/AAAAAAAAB0c/THg0jNvX-lk/s72-c/fiverr.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2014/06/earn-money-without-investment.html-part-2.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2014/06/earn-money-without-investment.html-part-2.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte