Archive Pages Design$type=blogging


Android फोनची योग्य निगा राखण्याचे ११ उपाय

तुम्ही जर अॅन्ड्रोईड फोन वापरत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे, फोनची योग्य निगा राखल्यामुळे फोनचे नुसते आयुष्यच वाढते असे नाही तर फोन पूर्ण क्षमतेवर व्यवस्थित काम करतो.

आज बहुतांश लोक अॅन्ड्रोईड स्मार्टफोन वापरणे पसंत करतात. कमी किंमत, चांगल्या सुविधा आणी उपयुक्त सोयी असल्यामुळे कुठला फोन घ्यायचा हा कधीकाळी पडणारा प्रश्न आता कुठला अॅन्ड्रोईड फोन घ्यायचा अशा स्वरुपात पडायला लागला आहे. तुम्ही जर अॅन्ड्रोईड फोन वापरत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे, फोनची योग्य निगा राखल्यामुळे फोनचे नुसते आयुष्यच वाढते असे नाही तर फोन पूर्ण क्षमतेवर व्यवस्थित काम करतो.

अॅन्ड्रोईड फोनची योग्य निगा राखण्याचे ११ उपाय


खालील उपायांमुळे तुमच्या अॅन्ड्रोईड फोनची योग्य निगा राखली जाईल..

#  १.  आवश्यक तेवढेच चार्जिंग करा –

काही जण फोन चार्ज करण्यासाठी संपूर्ण रात्रभर चार्जिंग सुरु ठेवतात पण खर तर फोनची बॅटरी ०% पासून १००% संपूर्ण चार्ज होण्यासाठी जास्तीत जास्त २ तास पुरेसे आहेत तेव्हा तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त फोन चार्ज करत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे अती चार्ज केल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते आणी वारंवार अती चार्ज केल्याने बॅटरीच्या कार्यक्षमतेवर देखील त्याचा परिणाम होतो.

#  २.  फोन स्वच्छ ठेवा –

तुम्ही फोनसाठी चांगले कव्हर वापरता, वेळोवेळी स्क्रीन पुसून स्वच्छ ठेवता पण फोन आतून स्वच्छ ठेवता का? आपण जेव्हा वेगवेगळी एप्लिकेशन्स वापरतो तेव्हा ती एप्लिकेशन्स अनेक फोनमध्ये अनेक अनावश्यक फाईल्स तयार करतात ज्या फाईल्स फक्त एप्लिकेशन्स वापरताना उपयुक्त असतात पण त्यानंतर त्या फाईल्स फोन मधील जागा अडवतात आणी स्टोरेज पूर्ण भरले जाते. यासाठी फोन वेळोवेळी आतून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे यासाठी प्ले-स्टोअर मध्ये Clean Master किंवा ES File Explorer सारखी एप्लिकेशन्स उपयुक्त आहेत.

#  ३.  अनावश्यक एप्लिकेशन्स हटवा –

तुम्ही जर फोनमध्ये कधीकाळी ईन्स्टॉल केलेली एप्लिकेशन्स वापरत नसाल तर ती देखील फोनमधून हटवा. कारण काही एप्लिकेशन्स वापरात नसतानाही फोनमध्ये सुरु राहतात आणी त्याचा परिणाम फोनच्या वेगावर होतो. फोन मधून अनावश्यक एप्लिकेशन्स हटवण्यासाठी एकतर तुम्ही थेट अन-ईन्स्टॉल करू शकता किंवा नंतर कधी वापरायची असल्यास आधी त्यांचा बॅकअप घेऊ शकता (किंवा मग प्ले-स्टोअर वर उपलब्ध असल्यास कधीही इंटरनेटद्वारे फोनमध्ये घेता येतात). Clean Master सारख्या एप्लिकेशन मधून इतर एप्लिकेशन्सचा बॅकअप घेता येतो जो .APK या फॉरमॅट मध्ये असतो.

#  ४.  फोन बंद पडू द्या –

तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी कमी झाल्यावर दर वेळी लगेच चार्जिंग सुरु करता का? पुढच्या वेळी तसे न करता फोनची बॅटरी ०% पर्यंत खाली येऊन फोन बंद पडू द्या आणी मग त्यानंतरच चार्जिंग सुरु करा. मानवी शरीराला जशी उपासाची गरज आहे तसच इथेही आहे यामुळे बॅटरीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. महिन्यातून एकदा फोन बंद पडू द्या आणी त्यानंतरच चार्जिंग सुरु करा.

#  ५.  बॅटरी थेट काढू नका  –

तुम्ही सीम कार्ड किंवा मेमरी कार्ड फोनमध्ये टाकताना किंवा फोनमधून काढताना बॅटरी थेट काढता का? यापुढे तसे करू नका आणी बॅटरी काढायच्या अगोदर फोन स्वीच ऑफ करा आणी खात्री झाल्यावर मगच बॅटरी काढा. फोनचे चार्जिंग सुरु असतानाही बॅटरी अजिबात काढू नका.

#  ६.  फोनचा अॅन्टीव्हायरस अपडेटेड ठेवा –

बहुतेक फोनमध्ये अॅन्टीव्हायरस आधीपासूनच ईन्स्टॉल केलेला असतो पण तो आपल्याकडून अपडेटेड ठेवला जात नाही परिणामी नव-नवीन व्हायरसची माहिती फोनमधील अॅन्टीव्हायरसला नसल्यामुळे त्या व्हायरसपासून धोका असतो. तुमच्या फोनमध्ये जर आधीपासून अॅन्टीव्हायरस ईन्स्टॉल केलेला नसेल तर प्ले स्टोअर मधून अधिकाधिक पसंती (Ratings) असलेला अॅन्टीव्हायरस फोनमध्ये ईन्स्टॉल करा आणी वेळोवेळी अपडेट करा.

#  ७.  संगणकावरील अॅन्टीव्हायरस मधून स्कॅन करा –

एक से भले दो ही उक्ती आपण नेहेमीच ऐकतो, त्यामुळे फोनमध्ये जरी अॅन्टीव्हायरस ईन्स्टॉल केलेला असला तरीही ठराविक कालांतराने संगणकावरील अॅन्टीव्हायरस मधून डेटा केबल द्वारे किंवा मेमरी कार्ड रीडर द्वारे फोन / मेमरी कार्ड स्कॅन करा.

#  ८.  अॅन्ड्रोईड फोन रुट करू नका – 

तुम्हाला जर रुट करण्याबाबत माहिती नसेल (सुदैवाने) तर फोन रुट करण्याचा प्रयत्न देखील करू नका कारण फोन रुट करताना काही गडबड झाली तर फोन कायमचा बंद पडू शकतो. फोन रुट केल्यावर फोनसाठी लागू असलेली सर्व वॉरन्टी संपुष्टात येते त्यामुळे अधिकृतरित्या कंपनीकडे दाद सुद्धा मागता येत नाही . थोडक्यात फोन रुट करणे म्हणजे फोनच्या सॉफ्टवेयर बरोबर छेडखानी करणे, त्यामुळे फोनच्या सुरक्षेचे देखील प्रश्न उद्भवतात.

#  ९.  फोनचे चार्जिंग सुरु असताना फोन वापरू नका –

तुम्ही फोनचे चार्जिंग सुरु असताना फोन वापरता का? यापुढे शक्यतो असे करू नका. फोन गरजेपुरता चार्ज झाल्यावर मगच तो वापरा. तुम्हाला हे माहिती आहे का, फोनचे चार्जिंग सुरु असताना फोन स्वीच ऑफ किंवा फ्लाईट मोड वर असेल तर तो कमी वेळात जास्त चार्ज होतो? पुढच्या वेळी हे करून पहा.

#  १०.  अनोळखी एप्लिकेशन्स पासून दूर रहा –

आपल्या अॅन्ड्रोईड फोनमध्ये गुगल प्ले-स्टोअर किंवा इतर कोणतेही गुगल निर्मित एप्लिकेशन वापरायचे असेल तर आपल्याला गुगल खाते वापरून लॉगइन करणे अनिवार्य आहे पण चुकून किंवा व्हायरस द्वारे ईन्स्टॉल केले गेलेले एप्लिकेशन आपली सर्व माहिती (उदाहरणार्थ – Contacts, SMS, Whats App Chats, Gallery Photos, Files इत्यादी) सर्व आपल्या नकळत हॅकर पर्यंत पोहोचवू शकते हे टाळण्यासाठी अनोळखी एप्लिकेशन्स पासून दूर रहा आणी शक्यतो गुगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर कुठूनही एप्लिकेशन्स ईन्स्टॉल करू नका (कारण प्ले स्टोअर मधील प्रत्येक एप्लिकेशन गुगलकडून तपासले जाते त्यामुळे तिथे धोक्याची शक्यता कमी आहे).

#  ११.  अनोळखी संदेशांपासून दूर रहा –

काही संकेतस्थळे वापरताना अनोळखी संदेश दाखवले जातात उदाहरणार्थ तुम्ही आमच्या वेबसाईटचे १,००० वे भाग्यवान व्हिजिटर आहात म्हणून तुम्हाला आयफोन भेट दिला जात आहे किंवा तुमच्या फोनमध्ये व्हायरस सापडला आहे इथे फ्री स्कॅन करून घ्या इत्यादी इत्यादी इत्यादी.. काही वेळा जाहिराती पाहताना क्षणिक भावनेला आवर घातला नाही तर त्यातून पुढे मनस्ताप होतो त्यामुळे अशा प्रकारच्या किंवा अशाच प्रकारच्या इतर संशयास्पद सर्व संदेशांपासून दूर रहा कारण यातून तुमची माहिती हॅकरपर्यंत पोहोचू शकते.

तुम्ही तुमच्या फोनची कशी काळजी घेता? इतर वाचकांना काय सुचवालं?

COMMENTS

Say Something
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: Android फोनची योग्य निगा राखण्याचे ११ उपाय
Android फोनची योग्य निगा राखण्याचे ११ उपाय
तुम्ही जर अॅन्ड्रोईड फोन वापरत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे, फोनची योग्य निगा राखल्यामुळे फोनचे नुसते आयुष्यच वाढते असे नाही तर फोन पूर्ण क्षमतेवर व्यवस्थित काम करतो.
http://4.bp.blogspot.com/-GuG47_gOBhg/VoopX4fYk1I/AAAAAAAACrE/UVDfVc5waD0/s1600/Android%2B-%2Bmaintaince%2B-%2Btips.jpg
http://4.bp.blogspot.com/-GuG47_gOBhg/VoopX4fYk1I/AAAAAAAACrE/UVDfVc5waD0/s72-c/Android%2B-%2Bmaintaince%2B-%2Btips.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2016/01/android-maintenance-tips-marathi.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2016/01/android-maintenance-tips-marathi.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte