Infobulb बद्दल,Infobulb म्हणजे २०१३ मध्ये स्थापन झालेली अशी अनुदिनी आहे जी तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयक माहिती प्रसिद्ध करते. संकेतस्थळ सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहितीचा प्रसार करणे हा होय. जेणेकरून लोकं त्या माहितीचा सुयोग्य वापर ते दैनंदिन जीवनात करून सुसह्यता आणु शकतील. दर महिन्याला Infobulb ची पाने २००० वेळा वाचली जातात. आणी Infobulb ची नोंदणी अनेक ब्लॉग संचिकेत झाली असुन Alexa, Woorank & Ranklite इत्यादी संकेतस्थळांनी Infobulb ला उत्तम दर्जा दिला आहे. Infobulb च्या सभासदांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे.
लेखकाबद्दल,Infobulb ची संकल्पना यशोधन याची आहे, यशोधन वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असुन माहिती तंत्रज्ञान, छायाचित्रण बाबीत विशेष रुची बाळगतो तसेच एक संगीत प्रेमी, प्रवासी आणी अनेक समाजसेवी संस्थांचा सभासद आहे. यशोधन याच्याशी संपर्क साधण्यासाठी Google+, Facebook किंवा Twitter चा वापर करू शकता अथवा वयक्तीक अनुदिनीवर भेट देऊ शकता.
प्रशस्तिपत्रे,
★ ‘Momscribe’ अनुदिनीच्या उमा म्हणतात “हे संकेतस्थळ वापरण्यास साधे आणी सोपे आहे. इंग्रजी भाषेबरोबरच येथे मराठी भाषेत देखील साहित्य उपलब्ध आहे. अधिकतम लेख हे माहितीपुर्ण आणी समजण्यास सोपे आहेत. टापटीप टंक आणी छान मुख्य छायाचीत्र या संकेतस्थळासाठी पर्वणीच आहेत”
★ ‘Ghumakkar's Diary’ अनुदिनीचे पुनित म्हणतात “हि अनुदिनी खुप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आली असुन याचा टापटीपपणा जपण्यात आला आहे. हाताळण्यास सोपी आणी येथे एखाद्याला अपेक्षित असलेली माहिती मिळवु शकतो. इंग्रजी आणी मराठी लेखांचे छान मिश्रणही दोन्ही वर्गातील वाचकांना मुखपृष्टावर चांगले दिसते..”
✰✰✰
Read in English Team Infobulb
इंग्रजीतुन वाचा 1st August 2013